शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
3
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
4
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
5
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
6
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
7
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
8
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
9
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
10
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
11
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
12
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
13
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
14
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

संभाजी भिडे यांना २६ मार्चपर्यंत अटक करा, अन्यथा मुंबईत मोर्चा काढू - प्रकाश आंबेडकरांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2018 16:13 IST

कोरेगाव-भीमा हिंसाचाराप्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटे यांना पोलिसांनी बुधवारी अटक केली. मात्र या प्रकरणातील अन्य एक आरोपी संभाजी भिडे यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. त्यामुळे संभाजी भिडे यांच्यावरील कारवाईसाठी  भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आक्रमक झाले आहेत.

मुंबई -  कोरेगाव-भीमा हिंसाचाराप्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटे यांना पोलिसांनी बुधवारी अटक केली. मात्र या प्रकरणातील अन्य एक आरोपी संभाजी भिडे यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. त्यामुळे संभाजी भिडे यांच्यावरील कारवाईसाठी  भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आक्रमक झाले आहेत. संभाजी भिडे यांना येत्या २६ मार्चपर्यंत अटक करा, नाहीतर मुंबईत मोर्चा काढण्याचा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, " कोरेगाव-भीमा येथे झालेला हिंसाचार भडकवण्यामध्ये मिलिंद एकबोटे यांच्याप्रमाणेच संभाजी भिडे यांचाही हात आहे. त्यामुळे मिलिंज एकबोटे यांच्यासोबतच संभाजी भिडे यांनाही येत्या २६ मार्चपर्यंत अटक करण्यात यावी. जर २६ मार्चपर्यंत भिडे यांना अटक झाली नाही तर कोरेगाव-भीमा शौर्य दिन प्रेरणा अभियान आणि सम्यक विद्यार्थी आंदोनातर्फे मुंबईत मोर्चा काढण्यात येईल."  दरम्यान, कोरेगाव-भीमामधील हिंसाचार घडविल्याचा आरोप असलेला मिलिंद एकबोटे याला 19 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. पुणे सत्र न्यायालयातने गुरूवारी (15 मार्च) रोजी हा निर्णय दिला. कोरेगा भीमामध्ये हिंसाचार घडविल्याचा आरोप ठेवत बुधवारी (14 मार्च) मिलिंद एकबोटेला अटक करण्यात आली होती. मिलिंद एकबोटेचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने बुधवारी फेटाळल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी त्याला अचक केली. अटकेनंतर गुरूवारी सकाळी मिलिंद एकबोटेला न्यायालयात हजर करण्यात आलं. पुणे सत्र न्यायालयाने 22 जानेवारीला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी त्याविरोधात उच्च न्यायालयात अपील केलं होतं. पण उच्च न्यायालयानेही त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. 1 जानेवारी रोजी शौर्य दिनानिमित्त कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी संपूर्ण राज्यातून हजारोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी आले होते. त्या वेळी तेथे दगडफेक, जाळपोळ झाली होती. ही दंगल घडवून आणल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल आहे. काय आहे प्रकरण - पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव-भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर तरुणांनी रॅली काढली. त्याचवेळी पुण्याकडून कोरेगावच्या दिशेने आंबेडकरी अनुयायी येत होते. रस्त्यावरील गर्दीतून झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे पर्यवसान दगडफेक व जाळपोळीत झालं. सोमवारी भीमा कोरेगावच्या रणसंग्रामाला 200 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय दिवस साजरा होत असताना, तिथूनच जवळ असणाऱ्या सणसवाडी गावाच्या परिसरात दोन गटांमध्ये वाद उफाळला. सणसवाडीतील वादाचं पर्यवसान हाणामारीमध्ये झालं आणि त्यातून अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली.  दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला आहे. घटनेचे पडसाद मराठवाड्यातही उमटले होते.   

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीMilind Ekboteमिलिंद एकबोटे