शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

व्हायरल व्हिडिओ प्रकरणी राज प्रकाश सुर्वेंना अटक करा, कारण...; वरूण सरदेसाईंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 16:08 IST

पोलिसांकडे ही तक्रार गेल्यानंतर हा व्हिडिओ मॉर्ब झालाय की नाही हे शोधायला हवं असं वरूण सरदेसाईंनी म्हटलं.

मुंबई - शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणी आता ठाकरे गटानेही आक्रमक होत प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ८ ते १० तरुणांना ताब्यात घेतले आहे. त्यात युवासेनेच्या साईनाथ दुर्गे यांचाही समावेश आहे. त्यानंतर आता विधानसभेत या मुलांच्या अटकेनंतर विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले आहे. तर या प्रकरणी आमदार प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव राज सुर्वे यांना अटक करा अशी मागणी ठाकरे गटाचे नेते वरूण सरदेसाई यांनी केली आहे.

वरूण सरदेसाई म्हणाले की, पोलिसांकडे ही तक्रार गेल्यानंतर हा व्हिडिओ मॉर्ब झालाय की नाही हे शोधायला हवं. मॉर्ब व्हिडिओ झाला असेल तर खरा व्हिडिओ कुठे आहे? खरा व्हिडिओ समोर आला पाहिजे. हा व्हिडिओ प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव राज सुर्वे यांनी फेसबुक पेजवर अख्खा तसाच्या तसा लाईव्ह केला होता. तर त्यामुळे मुंबई पोलीस दल सक्षम आहे. ते बरोबर मुख्य आरोपी आहेत ज्यांनी हा व्हिडिओ बनवला तो प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव आहेत त्यांना अटक करू शकतात असं त्यांनी सांगितले. 

विधानसभेत खडाजंगीया प्रकरणावरून विधानसभेत आमदार जितेंद्र आव्हाड आणि मंत्री शंभुराज देसाई यांच्यात खडाजंगी झाली.  आमदार आव्हाड म्हणाले की, या प्रकरणात १४ मुलांना अटक केलीय. तो व्हिडिओ खरा की खोटा हे समोर येऊ द्या. रात्री २-२ वाजता पोलीस पोरांना उचलतायेत त्या पोरांची चुकी काय हे तरी कळू द्या. मुख्यमंत्री शिंदेंनी संवेदनशील होऊन या प्रकरणात उत्तर द्यावे. तरूण पोराचं आयुष्य यात बर्बाद होतंय असा सवाल त्यांनी विचारला. त्यावर शीतल म्हात्रे, राज प्रकाश सुर्वे यांच्याकडून आलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई केली. शीतल म्हात्रे या माध्यमांसमोर रडत होत्या. एखाद्या महिलेच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार आहे. कुठल्याही स्त्री मनाला हे सहन होणार नाही. रात्री २ वाजता उचलले पण हा तपासाचा भाग आहे. परंतु हे करताना काही वाटलं नाही का? असं सांगत शंभुराज देसाईंनी आव्हाडांना प्रत्युत्तर दिले. 

पुरुष आमदाराची बदनामी झाली नाही का?तर ठाकरे गटाच्या युवा नेत्याला या प्रकरणी अटक झाली. त्यावर साईनाथ दुर्गेला झालेली अटक ही चुकीची असून कायद्याचा गैरवापर आहे. मला ते प्रकरण फारसं माहित नाही. जो व्हिडिओ आलाय तो खरा की खोटा याचा शोध घ्या. व्हि़डिओ मॉर्फिंग झालंय की नाही त्याचा तपास करा. त्यासंदर्भातील पुरुष आमदाराची तक्रार आहे का? ते कुठे आहेत. बदनामी त्यांची झालीय. जर असा व्हिडिओ असेल तर त्यांचीही बदनामी झाली असेल. पुरुषाची बदनामी होत नाही का? आणि मिंदे गटातील महिलेचा आरोप माझी बदनामी झालीय. त्याबाबत खटले दाखल होऊ शकते. ही चित्रफित व्हायरल होतेय लाखो कोट्यवधी लोकांमध्ये जाते मग तुम्ही किती जणांना अटक करणार? असं सांगत संजय राऊतांनी सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला आहे.  

टॅग्स :Prakash surveप्रकाश सुर्वेVarun Sardesaiवरुण सरदेसाईMumbai policeमुंबई पोलीस