भाजपा आमदाराच्या भावास हत्या प्रकरणात अटक

By Admin | Updated: May 19, 2016 03:39 IST2016-05-19T03:39:28+5:302016-05-19T03:39:28+5:30

विकी ढेपे हत्येप्रकरणी भाजपा आमदार महेश चौघुले यांचे चुलत भाऊ राजू चौघुले याला मंगळवारी रात्री अटक करण्यात आली.

The arrest of the BJP MLA in the murder case | भाजपा आमदाराच्या भावास हत्या प्रकरणात अटक

भाजपा आमदाराच्या भावास हत्या प्रकरणात अटक


वज्रेश्वरी : भिवंडीतील रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता विकी ढेपे हत्येप्रकरणी भाजपा आमदार महेश चौघुले यांचे चुलत भाऊ राजू चौघुले याला मंगळवारी रात्री अटक करण्यात आली. त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता पुढील सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन दोषी असल्यास आमदार चौघुले यांनाही अटक करावी अशी मागणी केली होती. यामुळे पोलिसांनी तातडीने सूत्रे हालवून राजूला अटक केली.
या प्रकरणी आदित्य जाधव, सनी फुटाणकर, अमित गायकर,गोटया टंकरवाला,जयेश मिस्त्री, रुपेश कोमलवार यांना अटक झाली आहे. सध्या तेही पोलीस कोठडीत आहेत. या प्रकरणी चौघुुले यांनाही सहआरोपी करावे अशी मागणी आरपीआयच्या कार्यकर्त्यंानी केली होती. (वार्ताहर)

Web Title: The arrest of the BJP MLA in the murder case