मराठी अभिनेता राहुल सोलापूकर गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहेत. त्यांनी आधी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. आता त्यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केल्याचे समोर आले आहे. याबाबत एक व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. दरम्यान, आता राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनीही ट्विट करुन संताप व्यक्त केला आहे.
Maha Kumbh 2025 : जगातील सर्वात मोठी वाहतूक कोंडी; महाकुंभकडे जाणाऱ्या रस्त्यांवर १५ तास ट्रॅफिक जाम
मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी ट्विटवर पोस्ट करुन अभिनेता राहुल सोलापूरकर यांना अटक करुन कारवाई करण्याची मागणी केली आहे. "छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल बेताल- अपमानास्पद वक्तव्य करून सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या बौद्धिक दिवाळखोर राहुल सोलापूरकरला तातडीने अटक करून अत्यंत कठोर शासन करा", अशी मागणी अविनाश अभ्यंकर यांनी केली आहे.
राहुल सोलापूरकर यांचं आणखी एक वादग्रस्त विधान
एका मुलाखतीमध्ये बोलताना अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर वादग्रस्त विधान केले आहे,"रामजी सपकाळ यांच्या एका बहुजनाच्या घरात जन्माला आलेले एक भिमराव की जो आंबावडेकर नावाच्या एका गुरुजीकडून दत्तक घेतला जातो. त्याच नावावरून पुढे भिमराव आंबेडकर म्हणून मोठे होतात. त्यांनी प्रचंड अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जस म्हटलं आहे, तसं ते अभ्यास करून मोठे झाले आहेत त्या आर्थाने वेदांमध्ये भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात असं वादग्रस्त वक्तव्य राहुल सोलापूरकर यांनी केलं आहे. या विधानावरुन आता वाद सुरू झाला आहे.
राहुल सोलापूरकर यांनी माफी मागितली
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, सोलापूरकर यांनी एक व्हिडीओ शेअर करुन माफी मागितली आहे.
“गेली ४० वर्षे वावरत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर इत्यादी अनेक विषयांवर मी जगभर व्याख्याने देतो, या सर्वांपुढे नतमस्तक होऊन व्याख्याने देतो. ज्यांनी माझी व्याख्याने ऐकली आहेत, त्या सर्वांना माहितेय. पण तरीही असं का केलं जातंय, याविषयी मी अनभिज्ञ आहे. ज्या ज्या महामानवांना समोर ठेवून मी जगत असतो त्यांच्याविषयी वाईट वक्तव्य माझ्याकडून होणार नाही. आणि ज्यांना वाटतं माझ्याकडून झालं आहे, त्यांची मी माफी मागतो”, असं म्हणत अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.