शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

अर्णब गोस्वामींना 'हक्कभंग' भोवणार?, निखील वागळेंना झाली होती शिक्षा, एक पत्रकार गेले होते तुरुंगात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 15:41 IST

अर्णब गोस्वामींना कोणती शिक्षा होणार, याचा निर्णय विधानसभेची हक्कभंग समिती घेणार

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात आज विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्यात आला आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर गोस्वामींनी राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. गृहमंत्री अनिल देशमुखांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत यांच्यावर त्यांनी सातत्यानं टीका केली असून त्यांचा उल्लेख अनेकदा एकेरी भाषेत केला आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी गोस्वामींविरोधात हक्कभंग ठराव आणला आहे. हा प्रस्ताव पारित झाल्यास अर्णब यांच्यावर सभागृहाकडून कारवाई होऊ शकते.  हक्कभंग म्हणजे काय?निवडून आलेल्या लोकप्रतिनिधांचा अपमान झाल्यावर हक्कभंग आणला जातो. लोकप्रतिनिधांचा मान राखण्याची जबाबदारी समाजाची असते. त्यामुळेच त्यांना माननीय मुख्यमंत्री, आमदार असं म्हटलं जातं. याचा भंग झाल्यास, बेछूट आरोप केल्यास हक्कभंग प्रस्ताव आणला जातो.हक्कभंग प्रस्ताव आणल्यावर पुढे काय?अर्णब गोस्वामींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा एकेरी उल्लेख करून अरेरावीची भाषा वापरली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्यात आला. आता हे प्रकरण हक्कभंग समितीकडे जाईल. या समितीत सर्व पक्षातील नेत्यांचा समावेश असतो. त्यांची निवड विधानसभेचे अध्यक्ष करतात. विधानसभेतील पक्षाच्या आमदारांच्या संख्येवरून समिती सदस्यांची निवड होते.हक्कभंग म्हणजे काय रे भाऊ? जाणून घ्या आमदारांचे विशेषाधिकारसमितीमध्ये किती जणांचा समावेश?हक्कभंग समितीमध्ये किती सदस्य असावेत, हे सर्वस्वी विधानसभा अध्यक्ष ठरवतात. त्यासाठी सदनातील पक्षांचं पक्षीय बलाबल लक्षात घेतलं जातं. सध्याच्या परिस्थितीत भाजप सदनातील सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे भाजपचे सर्वाधिक सदस्य समितीत असतील. त्या तुलनेत शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या सदस्यांची कमी असेल. पण त्यांची एकत्रित संख्या भाजपपेक्षा जास्त असू शकेल.अर्णब गोस्वामींच्या अडचणीत वाढ, शिवसेनेने विधानसभेत मांडला हक्कभंगाचा प्रस्ताव​​​​​​​समितीकडून शिक्षा निश्चिती; अहवाल विधानसभेतहक्कभंग समितीकडून अर्णब गोस्वामींना नोटीस बजावण्यात येईल. त्यांना काही दिवसांची मुदत देण्यात येईल. हक्कभंग समितीसमोर आपलं म्हणणं मांडण्याची संधी त्यांनी दिली जाईल. त्यांनी माफी मागितल्यास त्यांना समज दिली जाईल. ते आपल्या आरोपांवर, विधानांवर ठाम असल्यास त्यांना शिक्षा सुनावण्यात येईल. हक्कभंग समिती याबद्दल अहवाल तयार करेल. हक्कभंग समितीत सर्वपक्षीय नेते असले, तरी तिचा अहवाल एकमतानं येतो. सदनाला शिक्षा कमी-जास्त करण्याचा अधिकारहक्कभंग समिती गोस्वामींसाठी निश्चित करेल. त्यांना तुरुंगात पाठवायचं की सदनासमोर कामकाज सुरू असेपर्यंत हात जोडून दिवसभर उभं करायचं, याचा निर्णय हक्कभंग समिती घेईल. त्यानंतर समितीचा अहवाल सदनासमोर ठेवला जाईल. त्यावर चर्चा होईल. समितीनं सुनावलेली शिक्षा कमी-जास्त करण्याचा अधिकार सदनाला असतो.रिया हे प्यादे! खरा मास्टरमाईंड कोण?; कंगनाचा अर्णब गोस्वामीसोबत चर्चेवेळी प्रश्न​​​​​​​गोस्वामींसमोर कोणते पर्याय?चूक मान्य केल्यास गोस्वामींना सभागृहाकडून समज दिली जाईल. अन्यथा त्यांना तुरुंगवास किंवा दिवसभर सदनात उभं राहण्याच्या शिक्षेला सामोरं जावं लागू शकतं. त्यांच्यासमोर न्यायालयात जाण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. लेखिका शोभा डे यांनी याच पर्यायाचा वापर केला होता. मल्टिप्लेक्समध्ये प्राईम टाईमला मराठी चित्रपट दाखवण्यात यावेत, या सरकारच्या आदेशावर त्यांनी ट्विट केलं होतं. त्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणला गेला. शोभा डे यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयानं शोभा डे यांना बजावण्यात आलेल्या नोटिशीलाच स्थगिती दिली. एप्रिल २०१५ मध्ये ही घटना घडली.याआधी कोणत्या पत्रकारांवर कारवाई?ब्लिट्झचे पत्रकार रुसी करंजिया यांच्याविरोधात हक्कभंग आणण्यात आला होता. त्यांनी शासनावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांची रवानगी नागपूरच्या तुरुंगात करण्यात आली होती.ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंविरोधात हक्कभंग आणण्यात आला होता. त्यांनी सरकारवर आरोप केले होते. त्यांना दिवसभर सभागृहात उभं करण्यात आलं होतं. नवशक्तीचे प्रकाश गुप्ते यांनाही हक्कभंगाला सामोरे जावं लागलं होतं. विधिमंडळातील प्रश्नांसाठी आर्थिक व्यवहार होतात, अशा स्वरूपाचा लेख त्यांनी लिहिला होता. काही पत्रकार हक्कभंग समितीसमोर त्यांची चूक मान्य करतात. मग त्यांना समज देऊन सोडलं जातं. पत्रकार प्रकाश पोहरे यांच्याबाबतीत असंच घडलं होतं.

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीRepublic TVरिपब्लिक टीव्हीUddhav Thackerayउद्धव ठाकरेAnil Deshmukhअनिल देशमुख