'वाय-फाय' वरून सेना-मनसेत वाद
By Admin | Updated: July 3, 2014 19:25 IST2014-07-03T19:25:25+5:302014-07-03T19:25:25+5:30
दादरच्या शिवाजी पार्कात वाय-फाय कुणाचं लावण्यात येणार यावरून शिवसेना आणि मनसे यांच्यात वादाला सुरूवात झाली आहे.

'वाय-फाय' वरून सेना-मनसेत वाद
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ३ - दादरच्या शिवाजी पार्कात वाय-फाय कुणाचं लावण्यात येणार यावरून शिवसेना आणि मनसे यांच्यात वादाला सुरूवात झाली आहे.
दादर, विले पार्ले या भागात मनसेने याआधीच वाय-फाय या प्रोजेक्टवर काम सुरू केले असल्याने शिवसेनेने आपला प्रोजेक्ट दादर व विलेपार्ले सोडून करावा त्याला आमचा आक्षेप राहणार नाही असे नगरसेवक आणि मुंबई पालिकेतील मनसेचे गटनेते देशपांडे यांनी सांगितले. तर शिवसेनेकडून वाय-फाय दादर परिसरात लावण्यात येईल अशी भूमीका शिवसेनेने घेतली असल्याने हा वाद आणखी विकोपाला जाणार की काय अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.