शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 21:10 IST

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली असेल, तर ती दुरुस्त करण्याची एकच संधी सरकारने उपलब्ध करून दिली आहे.

Ladki Bahin Yojana: लोकसभा निवडणुकीत महायुतीला जोरदार धक्का महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. ही योजना महाराष्ट्रातील महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरली. या योजनेमुळे महिलांना आर्थिक पाठबळ मिळाले. परिणामी विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीला धडाकेबाज विजय मिळाला. ही योजना लागू झाल्यापासून विरोधक सातत्याने टीका करताना दिसले. या योजनेत काही त्रुटी, गडबड आढळल्यानंतर राज्य सरकारने पावले उचलत  e-KYC करण्याचे बंधनकारक केले. परंतु, लाडकी बहीण योजनेत  e-KYC करतानाही काही चुका झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्या दुरुस्त करण्याची एकमेव संधी सरकारने दिली आहे. 

या योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी महिलांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण करताना ओटीपी मिळण्यात अडचणी येत होत्या. विशेषतः पती, वडील व मुलाच्या आधार क्रमांकावर मोबाइल नोंदणीकृत असल्याने ओटीपी उपलब्ध न होणाऱ्या अनेक महिलांचे ई-केवायसी रखडले. यासाठी सरकारने ई-केवायसीची अंतिम मुदत वाढवली असून, अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून आता प्रत्यक्ष कागदपत्रांच्या आधारे ई-केवायसी पूर्ण करता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यानंतर आता झालेली चूक दुरुस्त करण्याची एकच संधी राज्य सरकारने लाडक्या बहि‍णींना दिली आहे. 

लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी

e-KYC दुरुस्तीसाठी मिळणार एकच संधी! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी या दुर्गम, ग्रामीण भागातील आहेत. e-KYC प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून काही चूक होणे स्वाभाविक आहे. या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी अशा आशयाची अनेक निवेदने विभागास प्राप्त झाली आहेत. सदर योजना ही महिला सक्षमीकरणाच्या हेतूने राबविण्यात येत आहे, म्हणूनच या महिलांना e-KYC करताना झालेली चूक सुधारण्याची संधी देणे अत्यंत गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन e-KYC मध्ये केवळ एकदाच सुधारणा करण्याची अंतिम संधी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत देण्यात येत आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स पोस्टवर दिली. 

दरम्यान, या सोबतच पती किंवा वडील हयात नसलेल्या लाडक्या बहिणींना e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीही पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही प्रक्रिया अधिक सुलभ व सोपी असावी, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिला व बालविकास विभाग कटिबद्ध आहे, असे आश्वासनही आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ladki Bahin Yojana e-KYC error? Government offers correction chance: last date.

Web Summary : The Maharashtra government provides a final chance to correct e-KYC errors in the Ladki Bahin Yojana until December 31, 2025. This opportunity aims to aid women, especially in rural areas, facing difficulties with the e-KYC process. The initiative is part of the government's commitment to women's empowerment.
टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनाState Governmentराज्य सरकारMahayutiमहायुतीAditi Tatkareअदिती तटकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेस