कलागुणांपासून आर्ची वंचित

By Admin | Updated: June 14, 2017 00:32 IST2017-06-14T00:32:05+5:302017-06-14T00:32:05+5:30

‘सैराट’ चित्रपटातील दमदार अभिनयाच्या जोरावर राष्ट्रीय पुरस्कार मिळविणारी रिंकू राजगुरू उर्फ आर्चीला दहावीत कलागुणांसाठी देण्यात येणारे २५ गुण देण्यात आले

Archie deprived of artistic qualities | कलागुणांपासून आर्ची वंचित

कलागुणांपासून आर्ची वंचित

- दीपक जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ‘सैराट’ चित्रपटातील दमदार अभिनयाच्या जोरावर राष्ट्रीय पुरस्कार मिळविणारी रिंकू राजगुरू उर्फ आर्चीला दहावीत कलागुणांसाठी देण्यात येणारे २५ गुण देण्यात आले नसल्याचा प्रकार उजेडात आला आहे. आर्चीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने २५ गुण देण्याचा प्रस्ताव शाळेने पुणे विभागीय मंडळाकडे पाठविला होता. मात्र शासनाच्या अध्यादेशामधील तांत्रिक अडचणींमुळे तिला या गुणांपासून वंचित रहावे लागले आहे.
आर्चीला ६६. ४० टक्के गुण मिळाले. चित्रकलेत प्राविण्य मिळविल्याने तिला ५ गुण देण्यात आले. मात्र, राष्ट्रीय पुरस्कार मिळविल्याने तिला कलागुणांचे २५ गुण मिळायला हवे होते.

प्रस्तावावर विचार सुरू
अभिनेत्री आर्ची उर्फ रिंकू राजगुरू हिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने तिला कलागुणांचे २५ गुण देण्याचा प्रस्ताव पुणे विभागीय मंडळाकडे आला आहे. त्याबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे, लवकर त्याचा निर्णय घेतला जाईल.
-बबन दहिफळे, अध्यक्ष, पुणे विभागीय मंडळ

Web Title: Archie deprived of artistic qualities