शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील २० लाख लाभार्थ्यांना महाआवासची मंजुरीपत्रे, सांगलीत जयकुमार गोरे यांनी घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 13:45 IST

पुण्यात शनिवारी मुख्य कार्यक्रम; अमित शाह यांची उपस्थिती 

सांगली : प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या हप्त्याचे वितरण शनिवारी (दि. २२) होणार आहे. राज्यभरातील २० लाख लाभार्थ्यांना एकाच वेळी मंजुरीचे पत्र वितरित केले जाईल. याचा मुख्य कार्यक्रम पुण्यात होणार असून केंद्रीय गृहमंत्री नितीन गडकरी त्यासाठी उपस्थित राहणार आहेत. राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी सोमवारी सांगली जिल्हा परिषदेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याच्या तयारीचा आढावा घेतला.आढावा बैठकीत सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी, गटविकास अधिकारी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले. सांगलीत मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी गोरे यांचे स्वागत केले. यावेळी ग्रामीण विकास प्रकल्पाच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे, प्रमोद काळे आदी उपस्थित होते.

गोरे यांनी सांगितले की, पुण्यातील मुख्य कार्यक्रमापूर्वी ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत कार्यक्रम घ्यावेत. जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत, तालुक्याला आमदारांच्या उपस्थितीत व ग्रामपंचायतीत आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत सुमारे १०० लाभार्थ्यांचा मेळावा घ्यायचा आहे. पुणे येथील राज्यस्तरावरील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण राज्यभरात होणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतींत स्क्रीनची व्यवस्था करावी. हा कार्यक्रम उत्सवी स्वरुपात केला जावा.दरम्यान, सांगली जिल्ह्यात ३२ हजार १३३ घरकुलांचे उद्दिष्ट आहे. यातील मंजूर लाभार्थ्यांना या दिवशी मंजुरीपत्र व पहिला हप्ता वितरित केला जाणार आहे.

दोन मंत्री अचानक जिल्हा परिषदेतग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे सोमवारी अचानक जिल्हा परिषदेत आले. सोलापूरहून कोल्हापूरला जाताना व्हिडिओ काॅन्फरन्सिंगसाठी त्यांनी अचानक सांगलीत थांबण्याचा निर्णय घेतला. तसा निरोप सकाळी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला मिळाला. ऐनवेळच्या कार्यक्रमामुळे प्रशासनाची धावपळ झाली. याचदरम्यान, सायंकाळी सहा वाजता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे - पाटील हेदेखील जिल्हा परिषदेत अचानक आले. गोरे कोल्हापरला जाणार असल्याने त्यांच्यासोबत एकाच गाडीतून जाण्यासाठी ते आल्याचे सांगण्यात आले.

१० लाख लाभार्थ्यांना पहिला हप्तापुण्यातील कार्यक्रमात शाह यांच्या हस्ते महाआवासच्या २० लाख लाभार्थ्यांना एकाच वेळी घरकुल मंजुरीचे पत्र दिले जाईल. तर १० लाख लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्याचे अनुदान वितरित केले जाईल. या कार्यक्रमापूर्वी राज्यभरात ग्रामपंचायतस्तरीय, तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीministerमंत्रीJaykumar Goreजयकुमार गोरेPradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजनाPuneपुणेAmit Shahअमित शाह