एखाद्याच्या स्टाईलचं कौतुक करणं म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्वाचा आदर करणे - आलिया भट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2017 22:53 IST2017-11-14T22:40:00+5:302017-11-14T22:53:06+5:30
जेव्हा कधी आपण एखाद्याच्या स्टाईलचं कौतुक करतो तेव्हा आपण त्याच्या व्यक्तिमत्वाचं कौतुक करत असतो असं अभिनेत्री आलिया भटने सांगितलं आहे. लोकमतच्या महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 सोहळ्यालाठी आलिया भट उपस्थित होती.

एखाद्याच्या स्टाईलचं कौतुक करणं म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्वाचा आदर करणे - आलिया भट
मुंबई - जेव्हा कधी आपण एखाद्याच्या स्टाईलचं कौतुक करतो तेव्हा आपण त्याच्या व्यक्तिमत्वाचं कौतुक करत असतो असं अभिनेत्री आलिया भटने सांगितलं आहे. लोकमतच्या महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 सोहळ्यासाठी आलिया भट उपस्थित होती. यावेळी लेखक चेतन भगत यांच्या हस्ते मोस्ट स्टायलिश रायजिंग स्टार हा पुरस्कार आलिया भट्टला देण्यात आला. आलिया भटने स्टेजवर चेतन भगत यांच्यासोबत सेक्सी राधा गाण्यावर डान्सही केला. विशेष म्हणजे आलिया यावेळी मराठीतही बोलली.
लोकमतच्या महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 पुरस्कार सोहळ्याचे हे दुसरे वर्ष आहे. साई रिअल इस्टेट प्रस्तुत या सोहळ्याची गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उत्कंठा निर्माण झाली होती. मुंबईतील ताज लँडस् एण्ड हॉटेलमध्ये अतिशय स्टायलिश अंदाजात हा सोहळा सुरु आहे. सोहळ्यात चारचाँद लावण्यासाठी बॉलीवुडसह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक स्टायलिश सेलिब्रिटी उपस्थित आहेत. त्याचबरोबर सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांचीही उपस्थिती आहे.
अभिनेत्री काजोलने आई तनुजाच आपली खरी स्टाईल आयकॉन असल्याचं सांगितलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते काजोलला महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश ग्लॅमर आयकॉन पुरस्कार देण्यात आला. यावेळी आपली आई ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांच्याबद्दल बोलताना काजोल थोडी भावूक झालेली पहायला मिळाली.
लोकमतच्या महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 पुरस्कार सोहळ्याचे हे दुसरे वर्ष आहे. साई रिअल इस्टेट प्रस्तुत या सोहळ्याची गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उत्कंठा निर्माण झाली होती. मुंबईतील ताज लँडस् एण्ड हॉटेलमध्ये अतिशय स्टायलिश अंदाजात हा सोहळा सुरु आहे. सोहळ्यात चारचाँद लावण्यासाठी बॉलीवुडसह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक स्टायलिश सेलिब्रिटी उपस्थित आहेत. त्याचबरोबर सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांचीही उपस्थिती आहे.
लोकमत महाराष्ट्राज् मोस्ट स्टाइलिश अवॉर्ड सोहळ्याचे प्रोगेस पार्टनर कार्लटन, स्टार कॉस्मेटिक्स, जॉनी वॉकर तसेच झूम ,पिंक व्हिला, अफॅक्स आणि झी मराठी पार्टनर आहे.या सोहळ्यात मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी तसेच टीव्ही जगतातील कलाकारांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. आजवर आपण अनेक पुरस्कार सोहळे पाहिले असतील मात्र लोकमतच्या वतीने आयोजित हा सोहळा थोडा हटके आणि खास आहे. कारण महाराष्ट्राच्या मोस्ट स्टाइलिश पर्सनालिटीजलाच या पुरस्काराचे मानकरी होता येत आहे. या सोहळ्याला विविध सेलिब्रिटींची उपस्थिती लाभली आहे.
ट्रॉफीही स्टायलिश
महाराष्ट्रातील मोस्ट स्टायलिश लोकांना गौरवान्वित करण्यासाठी तशीच स्टायलिश ट्रॉफीही यंदा तयार करण्यात आली आहे. स्टायलिश महिला असो वा स्टायलिश पुरुष, दोघांचाही गौरव करण्यासाठी ही ट्रॉफी तयार करताना विचार करण्यात आला आहे. एका बाजूला लावण्य रुपी महिला तर मागच्या बाजूला बलदंड पुरूष साकारून डिझाइनचा एक नवा स्टायलिश आदर्श नमुनाच या निमित्ताने तयार करण्यात आला आहे़ अशा प्रकारची ट्रॉफी यापूर्वी कधीच तयार झाली नाही.