शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारकडून २७ महामंडळांवर नियुक्त्या: भाजपच्या वासुदेव काळेंनाही निष्ठेचं फळ; कॅबिनेट मंत्रि‍पदाचा दर्जा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 16:24 IST

भाजपच्या किसान मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांच्यावर महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

State Government ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होण्याआधी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेत १४ ऑक्टोबर रोजी २७ महामंडळांवर विविध नेत्यांची नियुक्ती केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांचा समावेश आहे. विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या नेत्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने सरकारने हा निर्णय घेतल्याचं बोललं जात असून या यादीत पुणे जिल्ह्यातून भाजपच्या किसान मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाचे विद्यमान पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांचाही समावेश आहे. वासुदेव काळे यांच्यावर महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे हे मागील ३० वर्षांहून अधिक काळ पक्षात सक्रिय असून त्यांनी भाजपच्या किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदाचीही जबाबदारी सांभाळली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात वासुदेव काळे हे मागील तीन दशकांपासून भाजपची खिंड लढवत पक्षविस्तारासाठी काम करत आहेत. पक्षाकडून याच निष्ठेचं त्यांना फळ देण्यात आल्याचं दिसत असून महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या अध्यक्षपदी वर्णी लागल्याने आता त्यांच्याकडे कॅबिनेट मंत्रि‍पदाचा दर्जा असणार आहे. या निमित्ताने दौंड तालुक्याला प्रथमच लाल दिवा मिळाल्याने तालुक्यात समाधान व्यक्त केलं जात आहे.

वासुदेव काळे यांचा राजकीय प्रवास 

- १९९२  भाजपचे काम सुरु केले.   - १९९५  भाजपा युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्षपदी वर्णी- १९९७ पुणे जिल्हा परिषद सदस्य - १९९९ दौंड विधानसभा भाजप उमेदवारी- २००१ दौंड विधानसभा पोटनिवडणूक उमेदवारी- १९९९-२००२ जिल्हाध्यक्ष भाजपा पुणे- सलग ४ वेळा बारामती लोकसभेचे निवडणूक प्रमुख २००४,२००९,२०१४,२०१९- २००२-२००७ संचालक भीमा सहकारी साखर कारखाना  - २००९  दौंड विधानसभा उमेदवार- उपाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश - सरचिटणीस भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश          - अध्यक्ष - भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश २०२१- भाजपाच्या प्रदेश स्तरावर विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या,किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस म्हणून उल्लेखनीय काम केले. किसान मोर्चा  प्रदेशाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली. - उल्लेखनीय संघटनात्मक काम व नियोजनाचा अनुभव यामुळे पुणे जिल्हा नियोजन समितीवर निवड. (जानेवारी २०२२ )- भाजपा पुणे जिल्हा ग्रामीण दक्षिणचे विद्यमान जिल्हाध्यक्ष - १४ ऑक्टोबर २०२४ रोजी महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद महामंडळ अध्यक्ष म्हणून जबाबदारी मिळाली.

२७ महामंडळांवर कोणाकोणाला मिळाली संधी? 

१) महाराष्ट्र रोजगार हमी परिषद- श्री शहाजी पवार- अध्यक्ष २) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ- श्री दिलीप कांबळे- अध्यक्ष ३) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समिती- श्री सचिन साठे- उपाध्यक्ष ४) महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग- श्री सतीश डोगा अध्यक्ष, श्री मुकेश सारवान- उपाध्यक्ष ५) वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ- श्री निलय नाईक- अध्यक्ष ६) महाराष्ट्र राज्य सहकार विकास महामंडळ- श्री अरविंद पोरट्टीवार- अध्यक्ष ७) महाराष्ट्र राज्य सहकार कृषी पणन मंडळ - श्री प्रशांत परिचारक - अध्यक्ष ८) मौलाना आझाद अल्पसंख्यांक विकास महामंडळ - श्री इद्रिस मुलतानी - उपाध्यक्ष९) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ - श्री प्रमोद कोरडे - अध्यक्ष १०) महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद- श्री वासुदेव नाना काळे - अध्यक्ष११) पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र राज्य मेंढी व शेळी विकास महामंडळ -श्री विजय वडकुते- अध्यक्ष, श्री बाळासाहेब किसवे - उपाध्यक्ष, श्री संतोष महात्मे - उपाध्यक्ष१२) महाराष्ट्र राज्य पेट्रोकेमिकल्स महामंडळ - श्री अतुल काळसेकर - अध्यक्ष१३) महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ - श्री राजेश पांडे -अध्यक्ष१४) महाराष्ट्र राज्य गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार मंडळ - श्री गोविंद केंद्रे- अध्यक्ष १५) महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा)- श्री बळीराम शिरसकर- सदस्य१६) राजे उमाजी नाईक आर्थिक विकास मंडळ -  श्री दौलत नाना शितोळे - उपाध्यक्ष१७) महाराष्ट्र वन विकास महामंडळ - श्री अतुल देशकर - उपाध्यक्ष१८) महाराष्ट्र राज्य सहकारी बँक वेतन समिती - श्री नरेंद्र सावंत-अध्यक्ष १९) महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) -  श्रीमती मिनाक्षी शिंदे अध्यक्षा,  श्रीमती राणी व्दिवेदी उपाध्यक्षा२०) आदिवासी विकास महामंडळ - श्री काशिनाथ मेंगाळ - अध्यक्ष २१) पै. कै मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ - श्री विजय चौगुले - उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) २२ ) आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मुंबई -  श्री अजय बोरस्ते - उपाध्यक्ष२३) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ -श्री भाऊसाहेब चौधरी - उपाध्यक्ष२४) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ  -  श्री आनंद जाधव - उपाध्यक्ष२५) महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ - श्री कल्याण आखाडे - उपाध्यक्ष २६) राज्य कंत्राटी कामगार सल्लागार मंडळ  - श्री श्रीनाथ भिमाले - अध्यक्ष२७ ) महाराष्ट्र राज्य ग्राहक संरक्षण परिषद -श्री संदीप लेले- अध्यक्ष, श्री अरुण जगताप- उपाध्यक्ष  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाState Governmentराज्य सरकारPuneपुणे