कोणीही या, पेपर तपासा!
By Admin | Updated: July 15, 2014 03:24 IST2014-07-15T03:24:14+5:302014-07-15T03:24:14+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभियांत्रिकी पदवी परीक्षेच्या उत्तरपत्रिका कोणीही तपासू शकते. त्यासाठी ना शिक्षणाची अट, ना अनुभवाची गरज!

कोणीही या, पेपर तपासा!
अश्विनी मघाडे, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभियांत्रिकी पदवी परीक्षेच्या उत्तरपत्रिका कोणीही तपासू शकते. त्यासाठी ना शिक्षणाची अट, ना अनुभवाची गरज! अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी मांडलेला हा ‘पीईएस’ अभियांत्रिकी महाविद्यालयातील पेपर तपासणीचा खेळ ‘लोकमत’ने एका स्टिंग आॅपरेशनमधून चव्हाट्यावर आणला आहे.
अभियांत्रिकी उत्तरपत्रिका तपासण्यास डॉ़ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ‘पीईएस’ महाविद्यालय, राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय, ‘एमआयटी’ महाविद्यालय व विद्यापीठाचा परीक्षा विभाग अशी चार केंद्रे निश्चित केली आहेत. निकाल वेळेवर लागावा, यासाठी उत्तरपत्रिकांच्या तपासणीचे काम घाईने उरकले जात आहे. मागणी करताच कुणालाही उत्तरपत्रिका उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तशी तक्रारही एका जागरूक प्राध्यापकाने ‘लोकमत’कडे केली. याची शहानिशा करण्यास ‘लोकमत’ प्रतिनिधी चक्क प्राध्यापक बनून ‘पीईएस’ महाविद्यालयात गेली. त्यात धक्कादायक सत्य समोर आले आहे.