शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

गोळीबारामागे कुणाची चिथावणी?

By admin | Updated: May 5, 2015 01:32 IST

वाकोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विलास जोशी यांच्या हत्येसाठी साहाय्यक फौजदार दिलीप शिर्के यांना कोणी उसकावले होते का, असा प्रश्न गुन्हे शाखेला पडला

जयेश शिरसाट, मुंबईवाकोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विलास जोशी यांच्या हत्येसाठी साहाय्यक फौजदार दिलीप शिर्के यांना कोणी उसकावले होते का, असा प्रश्न गुन्हे शाखेला पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गुन्हे शाखेकडून शिर्केचे कॉल डिटेल्स तपासले जाणार आहेत. तसेच त्यांच्या सहकाऱ्यांकडेही चौकशी केली जाणार आहे.२ मेला रात्री आठच्या सुमारास वाकोला पोलीस ठाण्यात हा थरार घडला. या घटनेचा तपास गुन्हे शाखेकडे आहे. वाकोला पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या जबाबातून नेमकी घटना गुन्हे शाखेने समजावून घेतली आहे. आदल्या दिवशी रात्रपाळीत असलेले शिर्के नेमून दिलेल्या पॉइंटवर उपस्थित नव्हते म्हणून त्यांची गैरहजेरी नोंदविण्यात आली होती. २ मे रोजी रात्रपाळीत आलेल्या शिर्केना ही बाब समजली. ते संतापले आणि तडक जोशींच्या केबीनमध्ये शिरले. त्यांनी जोशींसोबत वाद घातला, तेव्हा जोशींनी त्यांना अनुपस्थित असल्याबद्दल जाब विचारला. या वादानंतर केबीनबाहेर पडलेल्या शिर्केने पॉइंटवर जाण्याच्या निमित्ताने शस्त्रागारातून सर्व्हिस रिव्हॉल्वर घेतली. तेवढ्यात जोशी घरी जाण्यासाठी केबीनबाहेर पडले. त्याचवेळी शिर्केने त्यांच्यावर पाठीमागून दोन गोळ्या झाडल्या.वाद झाला तेव्हा जोशींच्या केबीनमध्ये काही अधिकारी उपस्थित होते. त्यांच्या जबाबातून दोघांमधला वाद सौम्य होता. दोघांपैकी कोणीही अर्वाच्च भाषा वापरली नव्हती. केबीनबाहेर असलेल्यांना तर या वादाची माहितीही नसावी, अशी माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा की, वाद घातल्यानंतर लगेचच शिर्केने गोळीबार केलेला नाही. वाद घातल्यानंतर केबीनबाहेर पडलेल्या शिर्केने १५ ते २० मिनिटांनंतर जोशींवर गोळी झाडली. शिर्के रागाच्या भरात होता, तर मग त्याने इतका वेळ संयम कसा राखला? एखाद्याचा राग शांत होण्यासाठी २० मिनिटे पुरेशी असतात. त्याला विचार करण्याची संधी मिळते. तो आपला इरादा बदलू शकतो. त्यामुळे या २० मिनिटांमध्ये कोणी शिर्केचे कान भरले का, कोणी चिथावणी दिली का, असा प्रश्न गुन्हे शाखेला पडला आहे.विशेष म्हणजे आदल्यारात्री अडीज वाजता शिर्के पॉइंटवर अनुपस्थित असल्याने नाइट इन्चार्ज एपीआय शिंदे यांनी तशी पोलीस ठाण्याच्या डायरीत नोंद केली. या नोंदीची माहिती शिर्केला पोलीस ठाण्यातल्याच कोणीतरी पुरवली. त्यामुळेच शिर्केने लगोलग शिंदे यांना फोन केला आणि मी जेवायला बाजूला गेलो होतो, अशी सबब दिली होती. त्यानंतर पहाटे सहा वाजता गस्तीवर असलेल्या शिंदेंना शिर्के पॉइटवर दिसला नाही. त्या रात्री शिर्के कुठे होता, ते पॉइंटवर होता का, गोळीबाराआधीच्या २० मिनिटांमध्ये शिर्केने कोणाशी संपर्क साधला होता का, हे जाणून घेण्यासाठी गुन्हे शाखा त्यांचे कॉल डिटेल्स, टॉवर लोकेशन तपासणार आहे. याशिवाय त्यांच्या सहकाऱ्यांकडेही चौकशी करणार आहे. याशिवाय गुन्हे शाखेकडून शिर्केबद्दलची बारीकसारीक माहिती गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे. प्राथमिक चौकशीतून पूर्वी शिर्के वाकोला पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागात नेमणुकीस होता. मात्र विरोधात झालेल्या तक्रारी आणि त्यांच्या तापट स्वभावामुळे त्यांच्याकडून ही जबाबदारी काढून घेण्यात आली, अशी माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे. त्याचे सहकारी-वरिष्ठांशी असलेले संबंध, पोलीस ठाण्यातला आणि पोलीस ठाण्याबाहेरचा वावर या प्रत्येक मुद्द्यावर गुन्हे शाखा त्यांची माहिती घेत आहे.