वय ५ वर्षे, उणे १५ अंश सेल्सिअस तापमान; कोल्हापूरच्या अन्वीने केदारकंठा सर करत साजरी केली शिवजंयती

By संदीप आडनाईक | Updated: February 22, 2025 16:44 IST2025-02-22T16:43:49+5:302025-02-22T16:44:04+5:30

गिर्यारोहक क्षेत्रात आणखी एक विक्रम

Anvi Ghatge a young climber from Kolhapur scaled the snow capped peak Kedarkantha Uttarakhand in the Himalayas in minus 15 degrees Celsius on Shiv Jayanti and hoisted the Shiva flag | वय ५ वर्षे, उणे १५ अंश सेल्सिअस तापमान; कोल्हापूरच्या अन्वीने केदारकंठा सर करत साजरी केली शिवजंयती

वय ५ वर्षे, उणे १५ अंश सेल्सिअस तापमान; कोल्हापूरच्या अन्वीने केदारकंठा सर करत साजरी केली शिवजंयती

कोल्हापूर : उणे १५ अंश सेल्सिअस तापमानात हिमालय पर्वतरांगेतील केदारकंठा (उत्तराखंड) हे समुद्रसपाटीपासून १२,५०० फूट उंचीचे बर्फाच्छादित शिखर ५ वर्षे ६ महिन्याच्या अन्वी घाटगे या कोल्हापूरच्या छोट्या गिर्यारोहकाने १९ फेब्रुवारीला शिवजयंती दिवशी सर करून शिवध्वज फडकावला.

अन्वीने शिखरावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. गडकोट, दुर्ग संवर्धन करूया, डॉल्बीचा वापर टाळूया असा संदेश दिला. केदारकंठा शिखरावर स्वतः चढाई करणारी आणि परत साक्री येथे पोहोचणारी अन्वी ही जगातील सर्वांत लहान गिर्यारोहक ठरली. अन्वीचा हा सहावा जागतिक विक्रम असून लवकरच त्याची नोंद वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे. अन्वीच्या या विक्रमाबाबत शिवा ॲडव्हेंचरचे संस्थापक प्रमोद राणा आणि युवा वर्ल्डचे तेजस जिबकाठे यांनी प्रमाणपत्र दिले आहे. या मोहिमेमध्ये प्रा. अनिल मगर, प्रशिक्षक तसेच आई अनिता घाटगे, वडील चेतन घाटगे, मार्गदर्शक मनोज राणा व इतर गिर्यारोहक सहभागी झाले होते.

असा होता प्रवास

दि. १६ : देहराडूण ते साक्री (२१० किलोमीटर)
दि. १७ : उणे ६ अंश सेल्सिअस तापमानात मुख्य चढाईस सुरुवात
दि. १८ : प्रतिकुल परिस्थितीत चढाई करत बेस कॅम्प
दि. १९ : मध्यरात्री दोन वाजता चढाईस सुरुवात, स. ७ वाजता शिखर सर.
            
अन्वीचे रेकॉर्ड
-५ वर्ल्ड रेकॉर्ड
-६ एशिया बुक ऑफ रेकॉर्ड
-६ इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड
-६२ गडकोट दुर्ग संवर्धन, स्वच्छता मोहीम
-२५० हून अधिक व्यक्ती,संस्था, संघटनांकडून सन्मानित
-२१०० देशी झाडांची लागवड

Web Title: Anvi Ghatge a young climber from Kolhapur scaled the snow capped peak Kedarkantha Uttarakhand in the Himalayas in minus 15 degrees Celsius on Shiv Jayanti and hoisted the Shiva flag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.