पोलीस भरतीचा आणखी एक घोटाळा उघड चार पोलिसांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 06:07 IST2018-05-27T06:07:43+5:302018-05-27T06:07:43+5:30
नांदेड जिल्हा पोलीस दलात २०१८ प्रमाणेच २०१७ च्या भरतीतही घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून, प्रशिक्षण घेत असलेल्या आकाश पाटील, अजित परिट, साईनाथ स्वामी व श्याम माने यांना शुक्रवारी सोलापुरात अटक केली.

पोलीस भरतीचा आणखी एक घोटाळा उघड चार पोलिसांना अटक
नांदेड - जिल्हा पोलीस दलात २०१८ प्रमाणेच २०१७ च्या भरतीतही घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून, प्रशिक्षण घेत असलेल्या आकाश पाटील, अजित परिट, साईनाथ स्वामी व श्याम माने यांना शुक्रवारी सोलापुरात अटक केली.
२०१८ प्रमाणेच ओएमआर स्कॅनिंगद्वारे उमेदवारांचे गुण वाढवून देण्यात आले. अटक केलेल्यांना शनिवारी पाच दिवसांची कोठडी देण्यात आली. २०१७ च्या पोलीस भरतीत गैरप्रकारे किती उमेदवार नोकरीत आले, याची चौकशी
सुरू आहे़ तेव्हा संदीप कर्णिक यांच्याकडे तात्पुरता पदभार होता़
२०१८ मध्ये जिल्हा पोलीस दलात ६९ शिपाई पदासाठी भरती झाली होती़ लेखी परीक्षेत मोजक्या उमेदवारांना ९० पेक्षा अधिक गुण मिळाले होते़ ही बाब पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांना खटकली होती़
चौकशीनंतर उमेदवारांचे गुण ओएमआर स्कॅनिंगमध्ये वाढविल्याचे उघडकीस आले़ एसएसजी सॉफ्टवेअर कंपनीच्या संचालकांचाही सहभाग आढळला. २० जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून पोलिसांनी १६ जणांना अटक केली आहे़ मुख्य सूत्रधार प्रवीण भटकर फरार झाला आहे.