शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

राष्ट्रवादीचा आणखी एक नेता जामिनावर बाहेर, 8 वर्षांपासून तुरुंगात होते माजी आमदार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2023 13:35 IST

सगळ्याचा विचार करून कोणत्या गटात जायचे ते ठरविणार आहे, बाहेर येताच बदललेल्या राजकारणाचे सुतोवाच

अजित पवार भाजपासोबत सत्तेत गेल्यानंतर राष्ट्रवादीचे तुरुंगात असलेले नेते एकामागोमाग एक असे बाहेर येऊ लागले आहेत. काही दिवसांपूर्वी दीड वर्ष ईडीच्या कारवाईत तुरुंगात असलेले माजी मंत्री, आमदार नवाब मलिक यांची वैद्यकीय जामिनावर सुटका झाली होती. आता अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या कोट्यवधी घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या माजी आमदार रमेश कदम हे जामिनावर बाहेर आले आहेत.

राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांना ठाणे मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर सोडण्यात आले आहे. कारागृहाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. रमेश कदम राष्ट्रवादीचे माजी आमदार होते. 2014 त्यानंतर 2019 साली तुरुंगात असताना त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून सोलापूर मोहोळ या मतदार संघातून निवडणूक लढवली होती.

अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या कोट्यवधी घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक झाली होती. तब्बल 8 वर्षाच्या नंतर रमेश कदम हे ठाणे मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आले आहेत. यासाठी मुंबई, ठाणे, सोलापूर अशा विविध ठिकाणावरून मातंग समाजाचे कार्यकर्ते जमले होते.

रमेश कदम यांचे ठाणे मध्यवर्ती कारागृह बाहेर मातंग समाजाकडून जंगी स्वागत करण्यात आले. रमेश कदम हे त्यांच्या बोरीवली मधील निवासस्थानी जाण्यास रवाना झाले आहेत. मोहोळ मधील राजकीय परिस्थिती, मतदारांचा कल, कार्यकर्त्यांची मते या सगळ्याचा विचार करून  कोणत्या गटात जायचे ते ठरविणार आहे, असे रमेश कदम म्हणाले.

पंधरा दिवसात मोहोळमध्ये येणार : रमेश कदमअण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाकडून कर्ज स्वरूपात पैसे वाटले आहे. त्यामुळे त्याला करप्शन म्हणता येणार नाही. या प्रकरणात झालेल्या आरोपाची तपासणी करून न्यायालयाने आज जामीन मंजूर केले आहे. आठ वर्षाच्या कार्यकाळात मोहोळ मतदारसंघात अनेक बदल घडले आहेत. त्यामुळे येत्या पंधरा दिवसात मोहोळमध्ये जाऊन राजकीय परिस्थितीची माहिती घेऊन पुढील भूमिका ठरवणार असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार रमेश कदम यांनी जेलमधून बाहेर आल्यानंतर दिली.

टॅग्स :Ramesh Kadamरमेश कदमNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार