शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

आंबेडकरांची आणखी एक आघाडी फुटली!;विधानसभा निवडणुकीसाठी नवा सारिपाट मांडणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 3:16 AM

‘एमआयएम’सोबत काडीमोड

राजेश शेगोकारअकोला : सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून राजकारणात ‘अकोला पॅटर्न’ निर्माण करून प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय देणाऱ्या अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास प्रत्येक निवडणुकीत नवा प्रयोग केला. मात्र, प्रत्येक प्रयोग त्या-त्या निवडणुकीपुरताच ठरला. राज्याच्या राजकारणात दीर्घकालीन सक्षम पर्याय उभा करता आलेला नाही.

भारिप, भारिप-बमसं, रिडालोस, अशा अनेक प्रयोगांनंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी ‘एमआयएम’ला सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग केला. आता ‘वंचित’मधून ‘एमआयएम’ बाहेर पडल्यामुळे ‘वंचित’च्या प्रयोगाला मोठा ‘ब्रेक’ बसला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांसाठी ते कोणत्या नव्या भिडूसोबत सत्तेचा सारिपाट मांडतात, याकडे लक्ष लागले आहे. १९८० मध्ये अकोल्यात दाखल झालेल्या अ‍ॅड. आंबेडकरांनी राजकारणामध्ये ‘सामाजिक अभियांत्रिकी’च्या माध्यमातून सत्तेत जाण्याचा यशस्वी प्रयोग केला. प्रारंभी त्यांनी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया या पक्षावर काम सुरू केले. १९८४ ची लोकसभा निवडणूक त्यांनी याच पक्षावर लढविली. त्यावेळी त्यांचा अवघ्या १३ हजार मतांनी पराभव झाला. पुढे काँग्रेससोबत त्यांनी आघाडी करून लोकसभा गाठली; मात्र लवकरच भारिपचा विस्तार करीत बहुजन महासंघाची जोड देत अकोला पॅटर्नची मुहूर्तमेढ रोवली. या भारिप बहुजन महासंघाने १९९० ते २००४ पर्यंत राज्यात समर्थ पर्याय उभा केला. त्यानंतर मात्र अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांच्या सामाजिक अभियांत्रिकीच्या प्रयोगाला फारसे यश मिळाले नाही. स्वत: अ‍ॅड. आंबेडकर हे १९९९ नंतर सलग चौथ्यांदा लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले. विधानसभा निवडणुकीत एकमेव आमदार निवडून आणता आला. २००९ मध्ये १४ पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘रिडालोस’चा ते हिस्सा झाले; मात्र २०१४ मध्ये धनगर, ओबीसी, मुस्लीम यांना एकत्र करीत वंचित बहुजन आघाडीला जन्म दिला. याद्वारे जातनिहाय उमेदवार जाहीर करून वंचित समाजाच्या अस्मितेवर फुंकर घातली. या फुंकरमुळेच राज्यातील नऊ लोकसभा मतदारसंघांत विजयाचे स्वप्न पाहणाºया काँग्रेस आघाडीच्या आशेची ज्योत विझली व ‘वंचित’ची ताकद विधानसभेत किती पडझड करेल, याची गणिते मांडली जाऊ लागली; मात्र याच दरम्यान ‘एमआयएम’ने त्यांची साथ सोडली. ‘एमआयएम’चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनीच आघाडी संपल्याचे जाहीर केल्यानंतर आंबेडकरांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नसल्याने आता ते आणखी कोणता प्रयोग करतात, याकडे लक्ष लागले आहे.विविध राजकीय प्रयोगआंबेडकरांनी विविध राजकीय प्रयोग केले. कापसाच्या प्रश्नावर डाव्या आघाडीला सोबत घेऊन त्यांनी माकपचे तत्कालीन नेते प्रकाश कारत यांच्यासह मेळावेसुुद्धा घेतले. कधी लहान-मोठ्या संघटनांची मोट बांधली तर कधी विविध समाजांसाठी जागर मेळावे घेऊन बहुजन मतपेढी निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन