शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

स्मार्ट सिटीत धावणार एम्फिबिअस बस!, पाण्यासह जमिनीवर चालणारी देशातील दुसरी बससेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 2:43 AM

स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नवी मुंबईमध्ये जेएनपीटीच्या सहकार्याने एम्फिबिअस बससेवा सुरू करण्यात येणार आहे. चंदिगडनंतर हा देशातील दुसरा प्रकल्प असणार आहे.

नवी मुंबई : स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नवी मुंबईमध्ये जेएनपीटीच्या सहकार्याने एम्फिबिअस बससेवा सुरू करण्यात येणार आहे. चंदिगडनंतर हा देशातील दुसरा प्रकल्प असणार आहे. पाणी व रोडवरून चालणारी बससेवा सुरू करणारे राज्यातील पहिले शहर होण्याचा मानही नवी मुंबईला मिळणार आहे.नवी मुंबई सॅटलाइट व सुनियोजित शहर म्हणून ओळखले जात आहे. स्वच्छ भारत अभियानामध्ये देशात आठवा व राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. रिलायन्सचे मुख्यालय व अनेक महत्त्वाचे उद्योग येथे असल्याने नोकरी व्यवसायासाठी अनेक नागरिक देश-विदेशातून येथे येत आहेत; परंतु शहरात पर्यटक म्हणून भेट देणाºयांची संख्या कमी आहे. नागरिकांनी आवर्जून भेट द्यावी, असे ठिकाणच नाही. यामुळे महापालिकेने भविष्यात पर्यटनवृद्धीसाठी नवीन योजना आखण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून जेएनपीटीच्या माध्यमातून एम्फिबिअस (जमीन व पाण्यावर चालणारी) बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या बससेवेसाठी १० कोटी ६९ लाख रुपये खर्च होणार असून, सर्व खर्च जेएनपीटी करणार आहे. बसमार्गासाठीच्या पायाभूत सेवा निर्माण करण्यासाठीच्या परवानग्या महापालिका देणार असून, इतर प्राधिकरणांच्या परवानग्याही संबंधित यंत्रणाच मिळविणार आहे. महापालिकेला एकही रुपया खर्च होणार नसून, जर बससेवेतून नफा झालाच तर त्यामधील २५ टक्के रक्कम महापालिकेला देण्यात येणार आहे.महापालिकेने यापूर्वी नेरुळ सेक्टर २६मधील होल्डिंग पाँडचे सुशोभीकरण करून तेथे नौकाविहाराची सोय उपलब्ध करून देण्यासाठी ७ वेळा निविदा काढली होती; पण त्याला प्रतिसाद मिळाला नसल्याने अखेर एम्फिबिअस बस प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या नागरीकरणामुळे सार्वजनिक परिवहनामध्ये अनेक पर्यायाचा शोध घेण्याचे काम सर्व देशांमध्ये होत आहे. यामुळे एकाच वेळी जमिनीवरून व रोडवरून चालणाºया बसेस सुरू करण्याच्या पर्यायाचा विचार केला जात आहे. यापूर्वी चंदिगडमध्ये अशाप्रकारची बससेवा सुरू झाली आहे. नवी मुंबईच्या लौकिकात भर घालणारा हा प्रकल्प सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला आहे. तहकूब सभेमध्ये प्रशासनाने सादरीकरण केल्यानंतर हा प्रस्ताव मंजूर केला जाणार आहे. हा प्रकल्प राबविण्यामध्ये महापालिकेस काहीही खर्च होणार नसल्याने प्रस्तावास मंजुरी दिली जावी, असे आवाहन आयुक्त रामास्वामी एन. यांनीही केले आहे.>नावीन्यपूर्ण प्रकल्प राबविणारी महापालिकानवी मुंबई ही देशात सर्वप्रथम नवीन प्रकल्प राबविणारी महापालिका म्हणून ओळखली जात आहे. अत्याधुनिक मलनि:सारण केंद्र, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, पाणीपुरवठा यंत्रणा, आधुनिक तंत्रावर आधारित डंपिंग ग्राउंड उभारणारीही नवी मुंबई देशातील पहिली महापालिका असून, आता एम्फिबिअस प्रकल्प राबवणारीही राज्यातील पहिली महापालिका ठरणार आहे.एम्फिबिअस बसच्या प्रस्तावातील महत्त्वाच्या गोष्टीज्वेल आॅफ नवी मुंबई नेरूळ सेक्टर २६ हा धारण तलाव व त्यालगतचा परिसर या प्रकल्पाकरिता वापरण्यात येईल.सदर बसची मार्गिका नवी मुंबई महानगरपालिका येथून सुरू होऊन पामबिच मार्गालगत सर्व्हिस रोडवरून ज्वेल्स आॅफ नवी मुंबई तलावात प्रवेश करून तलावामध्ये फेरफटका मारून बस पुन्हा मूळ ठिकाणी येणारज्वेल्स आॅफ नवी मुंबई परिसर आणि मुख्यालय ते ज्वेल आॅफ नवी मुंबई पामबिच रोडलगतचा सर्व्हिस रोड वापरण्याची अनुमती पाच वर्षांसाठी अनुज्ञाप्ती व परवानगी देणार आहे.बस व तिच्या परिचनासाठी आवश्यक यंत्रणा जवाहरलाल नेहरू पत्तन न्यास स्वखर्चाने करणार आहे.बससेवेसाठी पायाभूत सुविधा तयार करण्याकरिता मनपा क्षेत्रातील आवश्यक परवानग्या विनामूल्य देण्यात येतील. मात्र, इतर आवश्यक परवानग्या जवाहरलाल नेहरू पत्तन न्यास स्वत: संबंधित प्राधिकरणाकडून उपलब्ध करून घेईल.बसच्या परिचलनासंदर्भातील सर्व बाबीचे व्यवस्थापन जवाहरलाल नेहरू पत्तन न्यास (जेएनपीटी) स्वखर्चाने करणार आहे.या प्रकल्पासाठी अटी, शर्ती संविदा करणे, परवानगी देणे याबाबतचे सर्व अधिकार मनपा आयुक्तांना असणार आहेत.संयुक्त प्रकल्पासंदर्भात कोणताही वाद निर्माण झाल्यास महापालिका आयुक्त लवाद म्हणून काम पाहणार असून त्यांचा निर्णय अंतिम राहणार आहे.या प्रकल्पातून नफा झाल्यास २५ टक्के वाटा महापालिकेस मिळणार आहे.