शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेला पुन्हा झटका! नवनियुक्त उपजिल्हाप्रमुखाचा काही तासांतच राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 09:25 IST

अलीकडेच आमदार उदय सामंत यांच्या समर्थकांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. 

रत्नागिरी - जिल्ह्यात पुन्हा एकदा शिवसेनेला झटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर जिल्ह्यातील आमदार उदय सामंत, योगेश कदम यांनी शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सामंत आणि कदम समर्थकांनीही उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. रत्नागिरीतील २३ पैकी २० नगरसेवक एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले. त्यानंतर आता उपजिल्हाप्रमुखपदी नेमणूक झालेले प्रकाश रसाळ यांनी काही तासांतच राजीनामा सोपवला आहे. 

प्रकाश रसाळ यांनी राजीनामा पत्रात लिहिलंय की, सामना दैनिकातून जाहीर झालेल्या शिवसेना उपजिल्हा प्रमुख पदाकरिता निवडीबाबत मला आनंद आहे. परंतु माझ्या प्रकृतीमुळे आणि कौटुंबिक समस्येमुळे मला या पदाला न्याय देता येणार नाही. त्यामुळे मी हे पद स्वीकारू शकत नाही. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहे असं पत्र रसाळ यांनी रत्नागिरी जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्याकडे पाठवलं आहे. 

इतकेच नाही तर रत्नागिरी युवा संघटक वैभव पाटील यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे. रत्नागरी तालुक्याच्या युवा संघटकपदी नियुक्ती झाली होती. परंतु माझ्या वैयक्तिक आणि कौटुंबिक अडचणींमुळे या पदाचा राजीनामा देत आहे तो मंजूर करावा अशी विनंती वैभव पाटील यांनी जिल्हाप्रमुख विलास चाळके यांना केली आहे. अलीकडेच आमदार उदय सामंत यांच्या समर्थकांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. 

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बापू म्हाप, शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर, महिला आघाडी संघटक कांचन नागवेकर यांना पदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीत नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. मात्र नव्या नियुक्तीनंतर काही तासांतच उपजिल्हाप्रमुख आणि युवा संघटक यांनी पदाचा राजीनामा दिल्यानं शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. मंडणगडातील शहर विकास आघाडीचे नगरसेवक शिंदे गटात

मंडणगड नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या कालावधीत शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या शहरातील शिवसैनिकांच्या शहर विकास आघाडीतील आठ लोकनियुक्त व एक स्वीकृत अशा ९ नगरसेवकांनी आमदार योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी या नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत आपण शिंदे गटात सहभागी होत असल्याचे जाहीर केले. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेUday Samantउदय सामंत