मुंबई - सरकारच्यावतीने मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या आश्वासनानंतर सकल मराठा क्रांती महामोर्चाने 16 दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण मागे घेतले आहे. मात्र आरक्षणाची घोषणा होईपर्यंत तसेच इतर मागण्या मान्य होईपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहील, असे सकल मराठा समाजाच्यावतीने जाहीर करण्यात आले. रविवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये प्रा. संभाजी पाटील यांनी या संदर्भातील माहिती दिली. या पत्रकार परिषदेत, प्रा. संभाजी पाटील म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासंबंधीची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन शनिवारी मुख्यमंत्र्यांच्यावतीने भेटण्यास आलेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. आता विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मराठा आरक्षणाबाबत दोन्ही सभागृहांची मंजुरी घेऊन त्याचे कायद्यात रुपांतर करून घेण्यासाठी सरकारला भाग पाडावे.'' तसेच आमरण उपोषण मागे घेण्यात आले असले तरी आरक्षणाची घोषणा होईपर्यंत आणि इतर मागण्यांची पूर्तता होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी घोषणाही पाटील यांनी केली.
उपोषण मागे, पण आरक्षणाची घोषणा होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, सकल मराठा क्रांती महामोर्चाची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 12:42 IST
सरकारच्यावतीने मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या आश्वासनानंतर सकल मराठा क्रांती महामोर्चाने 16 दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण मागे घेतले आहे. मात्र आरक्षणाची घोषणा होईपर्यंत तसेच इतर मागण्या मान्य होईपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहील
उपोषण मागे, पण आरक्षणाची घोषणा होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, सकल मराठा क्रांती महामोर्चाची घोषणा
ठळक मुद्देसरकारच्यावतीने मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या आश्वासनानंतर सकल मराठा क्रांती महामोर्चाने 16 दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण मागे घेतले आहेआरक्षणाची घोषणा होईपर्यंत तसेच इतर मागण्या मान्य होईपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहील. रविवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये प्रा. संभाजी पाटील यांनी या संदर्भातील माहिती दिली