शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कर्जमुक्त करा, 'लाडकी बहीण'सोबत 'लाडका भाऊ' योजना आणा; उद्धव ठाकरेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 13:34 IST

शेतकरी आत्महत्येवरून उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरलं. राज्यात कर्जमुक्ती करण्याची केली मागणी

मुंबई - Uddhav Thackeray on Farmers ( Marathi News ) राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, विधानसभा निवडणुकीपूर्वी त्याची अंमलबजावणी करा. त्याचसोबत लाडकी बहीण योजना आणतायेत तसा लाडका भाऊ योजना आणा. महिला-पुरुष भेदभाव करू नका अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवालय येथे पत्रकार परिषद घेत केली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यात नव्हे तर देशात एकमेव शेतकरी असेल जो हेलिकॉप्टरने शेतीत जातो आणि पंचतारांकित शेती करतो. विशेषत: अमावस्येला वेगळे पिक घेतात हे आम्ही ऐकलंय असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात करत राज्यात सरासरी ९ शेतकरी आत्महत्या करतायेत. १० हजार २२ कोटी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही. घोषित केलेली आकडेवारी कागदावरच, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत नाही. पीक विम्याचे पैसे नीट मिळत नाही. चित्रविचित्र गोष्टी राज्यात सुरू आहेत. त्यामुळे डबल इंजिन सरकार आलंय, कसंबसं एनडीएचं सरकार दुर्दैवाने आपल्या देशात परत आलंय. नागपूरच्या पहिल्याच अधिवेशनात कुणीही न मागता मी २ लाखांची पीक कर्जाची रक्कम माफ केली होती. त्याप्रमाणे तात्काळ शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर करून निवडणुकीच्या आत त्याची अंमलबजावणी करा असं त्यांनी म्हटलं. 

तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील कर्जमुक्तीची घोषणा अद्याप पूर्ण झाली नाही. नुसत्या घोषणा करू नये. अंमलबजावणी करा आणि मग निवडणुकीला सामोरे जा. मंत्र्यांना इतर कामे बरीच आहेत. शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला कुणी तयार नाही. जनतेचा वाली कोणी राहिला नाही. ज्याप्रमाणे मध्य प्रदेशात लाडली बहना अशी योजना आहे तशी राज्यात लाडकी बहीण योजना आणतायेत. मुली मुलांमध्ये भेदभाव करू नका, मुलींप्रमाणेच मुलांनाही योजना आणा. पोलीस भरतीत साडे सतरा हजार जागांसाठी लाखो अर्ज आलेत. भरतीसाठी आलेल्या तरुणांना राहण्याची व्यवस्था नाही. अनेक ठिकाणी सोयीसुविधा नाहीत. बेकारी वाढत चालली आहे असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. 

दरम्यान, तुमचं डबल इंजिन सरकारची मदत घेऊ राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले पाहिजे. लाडका भाऊ योजना आणा, माता भगिनींना लाभ देणार तसं भावानांही द्या. महिला कर्तृत्वान झाल्या आहेत. तुम्ही भेदभाव करू नका. महिला पुरुषांमध्ये भेदभाव न करता या योजना आणा. योजनेची चॉकलेट देऊ नका. लोकांची सहनशक्ती संपली आहे. जनता भोळी राहिली नाही. कुणीही यावं गाजर दाखवून काम करून घ्यायचे या गोष्टी जुन्या झाल्या. लाडकी बहीण, लाडका भाऊ आणल्यानंतर त्याची अंमलबजावणी सुधीर मुनगंटीवारांकडे देऊ नका. त्यांचे चंद्रपूरचं भाषण ऐकल्यानंतर अंगावर शहारे येतात.या व्यक्तीकडे अंमलबजावणीची जबाबदारी देऊ नका असा टोलाही उद्धव ठाकरेंनी सरकारला लगावला आहे.

ती भेट योगायोगाने

विधानभवनाच्या लिफ्टमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या भेटीवरही उद्धव ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलं. लिफ्टमध्ये मी देवेंद्र फडणवीस एकत्र होतो. "ना ना करते प्यार तुम्हीं से कर बैठे" असं काही नाही. योगायोगाने झालेली भेट होती असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेFarmerशेतकरीEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस