शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गरीब तरुणांच्या उद्यमशीलतेला 'अण्णासाहेब'चा नवा नियम अडसर, स्वप्नांना बसला खो 

By पोपट केशव पवार | Updated: March 19, 2026 17:19 IST

उत्पन्नाच्या प्रमाणात कर्ज मर्यादा ठरवण्याचा नवीन पायंडा

पोपट पवारकोल्हापूर : मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकांमधील तरुणांना उद्यमी बनवण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने व्याजपरतावा धोरण सुरू केले खरे, मात्र आता बँकाच्या नियमांमुळे उत्पन्नानुसार कर्जाची रक्कम ठरवण्याचा नवा नियम या महामंडळाने लागू केल्याने ज्याचे उत्पन्न कमी आहे त्याला सर्वांत कमी कर्ज मिळणार आहे. त्यामुळे या नव्या नियमाने गरिबांच्या उद्योजक बनण्याच्या स्वप्नांना खो बसला आहे.राज्यातील युवकांना व्यवसायामध्ये भरारी घेता यावी, उद्योग क्षेत्रात राज्य पुढे जावे यासाठी अण्णासाहेब पाटील कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. १८ पासून ते ६० वर्षांपर्यंतचा अर्जदार यासाठी पात्र ठरतात. अर्जदाराचे उत्पन्न हे ८ लाखांपेक्षा कमी असायला हवे. मात्र, कर्जाच्या प्रमाणात ३० टक्के उत्पन्न असायला हवे, हा नवा पायंडा महामंडळाने सुरू केल्याने ज्याचे उत्पन्न जास्त आहे, त्याला कर्जाची रक्कम त्याप्रमाणात दिली जाते.मात्र, ज्याचे उत्पन्न ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत आहे अशा अर्जदारांना उत्पन्नानुसार कर्ज मिळणार असल्याने अनेक तरुणांचे उद्योग उभारण्याचे स्वप्न भंगणार आहे. पूर्वी हा नियम नसल्याने उत्पन्न कमी असलेले तरुणही प्रकल्पाला लागणाऱ्या खर्चाइतके कर्ज घेऊन उद्योग उभारत होते. मात्र, नव्या नियमामुळे उत्पन्न जास्त नसेल तर प्रकल्पाच्या क्षमतेइतके अपेक्षित कर्ज मिळणार नाही.राज्यात पावणेदोन लाख लाभार्थीमहामंडळाच्या योजनेत राज्यात १ लाख ७६ हजार लाभार्थी आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांची संख्या राज्यात सर्वाधिक २० हजारांच्या पुढे आहे. महामंडळाच्या व्याजपरतावा योजनेला उदंड प्रतिसाद मिळत असून, यामध्ये रोज नव्याने प्रस्ताव दाखल होत आहेत. मात्र, उत्पन्नाचा नवा नियम लागू केल्याने अनेकांना अपेक्षित कर्ज मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.अनेकांना मिळणार नाही कर्जआठ लाखांच्या आतील उत्पन्न ग्राह्य धरताना उत्पन्नाच्या प्रमाणात कर्ज मर्यादा ठरविणारी नवीन उत्पन्न पद्धत अल्प गटातील युवकांसाठी अन्यायकारक ठरणारी आहे. कारण, त्यांचे वडिलोपार्जित तारण असूनही त्यांना ५ लाखांपुढील कर्जाला मुकावे लागणार आहे.

उत्पन्नाच्या प्रमाणात कर्ज मर्यादा ठरविणाऱ्या नवीन उत्पन्न पद्धतीत नव्या आर्थिक वर्षात सुधारणा करू. - विजयसिंह देशमुख, व्यवस्थापकीय संचालक, अण्णासाहेब पाटील, आर्थिक विकास महामंडळ. मुंबई.हा निर्णय नव उद्योजकांवर अन्याय करणारा आहे. महामंडळाच्या लाभार्थींना बॅंका कर्जे स्थावर मालमत्ता तारण घेऊनच देतात. परंतु, नव्याने उत्पन्नाचे स्लॅब लावून कर्ज मर्यादा ठरविल्याने व जाचक अटीने उद्योजक होण्यापासून रोखले आहे. -वसंतराव मुळीक, राष्ट्रीय उपाध्यक्ष, अखिल भारतीय मराठा महासंघ, कोल्हापूर.

English
हिंदी सारांश
Web Title : AnnaSaheb Scheme's new rule hinders poor youth entrepreneurship dreams.

Web Summary : AnnaSaheb Patil Corporation's new income-based loan rule threatens poor youth entrepreneurship. Lower income means less loan, dashing business dreams. Despite scheme success with beneficiaries, complaints arise as expected loans are denied.