अन्नपूर्णाच्या लेखिका मंगला बर्वेंचे निधन

By Admin | Updated: October 24, 2016 13:08 IST2016-10-24T13:08:11+5:302016-10-24T13:08:11+5:30

अन्नपूर्णा' या पाकशास्त्रावरील लोकप्रिय पुस्तकाच्या लेखिका मंगला अच्युत बर्वे यांचे काल रात्री निधन झाले.

Annapurna writer Mangla Barve passed away | अन्नपूर्णाच्या लेखिका मंगला बर्वेंचे निधन

अन्नपूर्णाच्या लेखिका मंगला बर्वेंचे निधन

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - 'अन्नपूर्णा' या पाकशास्त्रावरील लोकप्रिय पुस्तकाच्या लेखिका मंगला अच्युत बर्वे (८९) यांचे काल रात्री  मुंबईतील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. मागील पिढीतील नावाजलेले लेखक अच्युत बर्वे यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात मुली, जावई, नातवंडे व पंतवंडे असा परिवार आहे.
त्यांची 'अन्नपूर्णा', 'इच्छाभोजन', चायनीज पदार्थ तसेच विविध खाद्य पदार्थांवरची छोटी छोटी पुस्तके, तसेच डोहाळे बारसे, रुखवताचे पदार्थ, लोकरीने विणून केलेली खेळणी अशा अनेक विषयांवरील पुस्तके प्रसिद्ध होती.

Web Title: Annapurna writer Mangla Barve passed away