माझे सहकारमंत्रीपद गेल्याने अण्णा हजारेंना दु:ख - चंद्रकांतदादा पाटील
By Admin | Updated: July 14, 2016 13:32 IST2016-07-14T13:14:41+5:302016-07-14T13:32:55+5:30
गेली एकोणीस महिने माझ्याकडे असलेले सहकार खाते खांदेपालटामध्ये दुसऱ्याकडे गेल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंना वाईट वाटले, असे चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.

माझे सहकारमंत्रीपद गेल्याने अण्णा हजारेंना दु:ख - चंद्रकांतदादा पाटील
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. १४ - गेली एकोणीस महिने माझ्याकडे असलेले सहकार खाते खांदेपालटामध्ये दुसऱ्याकडे गेल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंना वाईट वाटले, त्यांनी स्वत: मला फोन करून याबद्दल दु:ख व्यक्त केले, असे माहिती महसूल व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी सांगितले.
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रथमच त्यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. ही शिक्षण संस्था आतापर्यंत काँग्रेसच्या नेत्यांच्या ताब्यात होती. आता मी अध्यक्ष झालो तरी संस्थेत राजकीय ढवळाढवळ करणार नसल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
पाटील म्हणाले,‘सहकारात मी चांगले काम केल्यामुळेच हजारे यांनी मला फोन करून महसूल खाते मिळाल्याबध्दल माझे पहिल्यांदा अभिनंदन केले. सहकार खात्यातील प्रकरणे धसास लावल्याबध्दल त्यांनी माझे कौतुक केले. हे खाते तुमच्याकडून जायला नको होते अशीही टिप्पण्णी हजारे यांनी केली. आता तुमच्याकडे महसूल हे दोन नंबरचे खाते आले आहे. या खात्यातही तुम्ही चांगली कामगिरी करुन दाखवाल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.’
माझे ज्ञान व पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना मला ऊसातील कांहीच कळत नाही असे वाटत होते. परंतू मी त्यांच्यासोबत अर्थंमत्री अरुण जेटली यांना एफआरपी प्रश्र्नी भेटायला गेल्यावर पवार यांना माझे ज्ञान कळाले असेही मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.