डान्सबार बंदीबाबत अण्णांना साकडे

By Admin | Updated: January 11, 2016 02:35 IST2016-01-11T02:35:52+5:302016-01-11T02:35:52+5:30

माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी रविवारी राळेगणसिध्दी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट

Anna has been asked to ban dance bars | डान्सबार बंदीबाबत अण्णांना साकडे

डान्सबार बंदीबाबत अण्णांना साकडे

पारनेर (अहमदनगर) : माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी रविवारी राळेगणसिध्दी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन डान्सबार बंदीबाबत प्रयत्न करण्यासाठी त्यांना साकडे घातले.
सरकार काय भूमिका घेते, याचा अभ्यास करून डान्सबार बंदीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे अण्णांनी सांगितले.
राज्यातील डान्सबार बंदीबाबत १० फेबु्रवारीला निर्णय होणार आहे. त्याआधीच मी योग्य निर्णय होण्यासाठी लोकांनी दबाव आणावा, यासाठी राज्यभर फिरत आहे. आपणही या विषयात लक्ष घालावे, अशी विनंती अण्णांना केल्याचे
स्मिता यांनी सांगितले. त्यावर आर. आर. पाटील यांनी डान्सबार बंदी केली, त्यावेळी मी त्यांच्यामागे सक्षमपणे उभा होतो, आता त्याच पद्धतीने तुमच्यामागेही उभा राहणार असून डान्सबार बंदी पुन्हा व्हावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असून वेळप्रसंगी आपण आंदोलनाची भूमिका घेऊ, अशी ग्वाही हजारे यांनी दिल्याची माहिती स्मिता यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Anna has been asked to ban dance bars