शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

आई तुम्ही भोळ्या आहात, तुमचा मुलगा...; परळीतील आंदोलनानंतर अंजली दमानियांकडून प्रश्नांची सरबत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 15:24 IST

वाल्मीक कराडवर दाखल असलेल्या गुन्ह्यांचा उल्लेख करत अंजली दमानिया यांनी प्रश्नांची सरबत्ती केली आहे.

Anjali Damania: पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशियत वाल्मीक कराड याच्यावर सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचा आरोप करत वाल्मीकच्या आईने परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर आज सकाळपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत वाल्मीक कराडवर दाखल असलेल्या गुन्ह्यांचा उल्लेख करत प्रश्नांची सरबत्ती केली आहे.

अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे की, "वाल्मीक कराड यांच्या आईंना सर्वप्रथम नमस्कार. आई आपण भोळ्या आहात, आपला मुलगा आणि नातू काय करतात याची कल्पना तुम्हाला असती तर आपण 'माझ्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे' असं कधीच म्हणाला नसतात. आपल्या मुलावर असलेल्या आरोपांची यादी मी पाठवत आहे. आपण ही यादी पाहावी, ही विनंती. त्यांच्यावर याला गुन्ह्यात झालेला FIR देखील आपण पाहावा," असं आवाहन दमानिया यांनी केलं आहे.

अंजली दमानिया यांनी वाल्मीक कराडच्या आईंना उपस्थितीत केलेले प्रश्न

१. आपल्या मुलाकडे इतक्या गाड्या कुठून आल्या हा प्रश्न आपल्याला पडला नाही का? २. आपल्या नातवाकडे बंदूक कशासाठी आहे हा प्रश्न आपल्याला पडला नाही का? ३. आपला मुलगा काय उद्योग करतो हा प्रश्न आपल्याला पडला नाही का? ४. संतोष मुंडे याच्या क्रूर हत्येनंतर त्यांचा पत्नीने वाल्मिक कराड यांचे नाव घेतले, ते चुकीचे आहे का? ५. आवादा कंपनीचे लोक यांनी केलेला FIR खोटा आहे का? ६. गोट्या गित्तेसारखी माणसं सदगृहस्त आहेत का?

दरम्यान, "एक आई म्हणून आपल्या मुलाबद्दल प्रेम असणे योग्य आहे, पण डोळ्यावर पट्टी बांधून चालणार नाही. त्यामागचे वास्तव आपण बघा ही विनंती. ‘वास्तव’ ह्या पिक्चर आपण बघा. एक वाया गेलेल्या मुलाला, आईने काय करायला हवं, ते आपण पाहा. संतोष देशमुख हे देखील कोणाचे पाती, वडील व भाऊ होते. त्यांना न्याय मिळायला हवा की नाही?" असा सवालही दमानिया यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :walmik karadवाल्मीक कराडanjali damaniaअंजली दमानियाbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणBeedबीडCrime Newsगुन्हेगारी