शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

“कायद्याने शिक्षा द्या, हे योग्य नाही”; खोक्याच्या घरावर बुलडोझर चालवल्यावर दमानियांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 13:52 IST

Anjali Damania News: खोक्या उर्फ गुंड सतीश भोसलेच्या घरावर वन विभागाने बुलडोझर फिरवत केलेल्या कारवाईबाबत अंजली दमानिया यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

Anjali Damania News: बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजे असतानाच 'खोक्या' उर्फ गुंड सतीश भोसले याचे काही गैरप्रकार आणि पैशाचा माज दाखवणारे व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्याने एका व्यक्तीला अमानुषपणे बेदम मारहाण केल्याचेही प्रकरण समोर आले होते. तो आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचेही स्पष्ट झाले होते. पोलीस शोध घेत असताना अखेर खोक्याला प्रयागराजमधून पोलिसांनी बेड्या ठोकल्या. बीड पोलीस सतीश भोसले याला घेऊन छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचले. तत्पूर्वी सतीश भोसलेच्या ठिकाणांवर वनविभागाने बुलडोझर चालवत कारवाई केली. यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नाराजी व्यक्त करत संताप व्यक्त केला आहे. 

पोलिसांकडून अटकेची कारवाई झाल्यानंतर वन विभागाने सतीश भोसलेल्या घरावर बुलडोजर चालवला. गुरुवारी दुपारी घर पाडण्यात आले. त्यानंतर रात्री २० ते २५ जणांनी घराला आग लावल्याची घटना घडली. काही लोकांनी अचानक हल्ला केल्याचा आरोप सतीश भोसलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. यात काही जण जखमी झाले असून, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शिरूर कासार शहरापासून काही अंतरावर वनविभागाची जागा आहे. इथे एक वस्ती बसलेली होती. मात्र, सतीश भोसलेचे गुन्हे समोर आले. त्यानंतर वनविभागाने अतिक्रमण करून अनधिकृत बांधण्यात आलेल्या घरांना नोटीस बजावली होती. इतर लोकांनी दुसरीकडे स्थलांतर केले. तर सतीश भोसलेचे कुटुंबीय त्याच घरात राहत होते. यानंतर अंजली दमानिया यांनी एक्सवर पोस्ट केली असून, त्यात नाराजी व्यक्त करताना, हे योग्य नसल्याचे म्हटले आहे. 

कायद्याने शिक्षा द्या, हे योग्य नाही

अंजली दमानिया आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हणतात की, सतीश भोसले चे घर जाळलं? का? खूप खूप खूप वाईट वाटलं. किती क्रूर. परिवाराची काय चूक? दुसऱ्या घरावर बुलडोझर चालवला? हे खूप खूप चुकीचं आहे. सतीशने कायदा हातात घेऊन ज्या चुका केल्या, त्यासाठी कायद्याने शिक्षा द्या पण घर का जाळलं? नाही हे योग्य नाही. Really feeling very bad, असे सांगत अंजली दमानिया यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. 

दरम्यान, : भाजपाचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेला कुख्यात सतीश ऊर्फ खोक्या भोसले याला जिल्ह्यातून हद्दपार करावे, यासाठी पोलिसांनी मार्च २०२४ मध्ये बीडच्या उपविभागीय अधिकारी (एसडीओ) यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता. परंतु, वर्षापासून त्यावर काहीही कारवाई न करता तो धूळ खात पडून होता. याबाबत 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित करताच एसडीओंना उशिराने जाग आली. त्यांनी खोक्याला दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. मात्र, खोक्या वेगवेगळ्या गुन्ह्यात जेलमध्ये जाणार असल्याने या हद्दपारीचा उपयोग काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. खोक्या भोसले हा आपलाच कार्यकर्ता असल्याचे आ. सुरेश धस यांनी सांगितले होते. याच खोक्याने नंतर गुन्हे केले. जर खोक्याला वेळीच हद्दपार केले असते, तर जिल्ह्यातील गुन्हे कमी झाले असते. तो आमदारांचा कार्यकर्ता असल्यानेच अभय मिळाले का? असा सवालही विरोधक विचारत आहेत.

टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याSuresh Dhasसुरेश धसanjali damaniaअंजली दमानियाBeed policeबीड पोलीसBeedबीड