शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अनिल परब यांना 'ईडी'चा दणका; साई रिसॉर्टसह १० कोटींची मालमत्ता जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 06:33 IST

जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये दापोली येथील मुरूडमधील ४२ गुंठे जमीन (किंमत २ कोटी ७३ लाख) आणि साई रिसॉर्ट (किंमत ७ कोटी ४६ लाख) ) आदींचा समावेश आहे.

मुंबई : दापोली येथील वादग्रस्त ठरलेल्या साई रिसॉर्टप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री अनिल परव यांची १० कोटी २० लाख रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी जप्त केली. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये दापोली येथील मुरूडमधील ४२ गुंठे जमीन (किंमत २ कोटी ७३ लाख) आणि साई रिसॉर्ट (किंमत ७ कोटी ४६ लाख) ) आदींचा समावेश आहे.

या कारवाईबाबत ईडीकडून प्राप्त माहितीनुसार, दापोली येथील साई रिसॉर्टप्रकरणी अनेक मुड्यांच्या अनुषंगाने तपास गेले अनेक दिवस सुरू होता. यामध्ये हे रिसॉर्ट सागरी नियंत्रण क्षेत्र-3 मध्ये येत असल्याच्या मुद्द्यावरून केंद्रीय पर्यावरण विभागाने दापोली येथील न्यायदंडाधिकारी यांच्याकडे तक्रारही दाखल केली होती. तर सरकारी यंत्रणेवर प्रभाव टाकणे आणि सरकारच्या महसुलाचे नुकसान केल्याचा ठपका ठेवत दापोली पोलिस ठाण्यामध्येदेखील गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी अनिल परब यांची जून महिन्यात चार वेळा चौकशी झाली होती. २१, २२ आणि २३ जूनला सलग तीन दिवस ईडीने परब यांची चौकशी केली होती. परब यांनी सदानंद कदम यांच्याशी संगनमत करून दापोली येथील प्रांत अधिकाऱ्यावर दबाव टाकून कृषक जमीन अकृषक करून घेतली, तसेच सीआरझेड तरतुदींचा उल्लंघन करीत बांधकाम केल्याचा ठपका सक्तवसुली संचालनालयाने ठेवला आहे.

ईडीचे म्हणणे....• महसूल खात्याकडून अवैधरीत्या परवानगी घेत तेथील भूखंडावर तळ मजला एक असे दोन बंगले परब यांनी बांधले.• या प्रकरणात आपले नाव येऊ नये याकरिता कागदोपत्री मूळ मालकाचे नाव परब यांनी कायम ठेवले होते आणि बांधकामासाठी अर्ज करताना मूळ मालकाची बनावट स्वाक्षरी केली होती.• ग्रामपंचायतीकडून परवानगी घेतेवेळी ही जागा सीआरझेड-३ मध्ये येत असल्याची बाब लपविली.• याप्रकरणी आर्थिक व्यवहार रोखीने करण्यात आले होते. प्रकरण उजेडात आल्यानंतर परब यांनी केवळ कागदोपत्री ही जमीन सदानंद कदम यांच्या नावे केली होती.

काय म्हणाले अनिल परब?"या रिसॉर्टशी माझा संबंध नाही. जी संपत्ती जप्त केलेली आहे त्याचे मालक सदानंद कदम आहेत. ईडीने या गोष्टी तपासलेल्या आहेत. त्यांची कारवाई चूक की बरोबर हे न्यायालय ठरवेल. मी न्यायालयात जाऊन न्याय मागेन. मला राजकीयदृष्ट्या बदनाम केले जात आहे."

प्रकरण कसे उजेडात आले?• प्राप्तिकर विभागाने मार्च २०२२ मध्ये केलेल्या छापेमारी दरम्यान परबयांनी २०१७ मध्ये दापोली येथे एक कोटी रुपयांना जमीन खरेदी केल्याचीमाहिती पुढे आली.• या जमिनीची नोंदणी २०१९ मध्ये झाली होती आणि परब यांनी ही जमीन सन २०२० मध्ये सदानंद कदम यांना एक कोटी दहा लाख रुपयांवर विकली होती. यावेळी या जागेवर रिसॉर्ट बांधलेले होते. मात्र, नोंदणी करताना रिसॉर्ट बांधल्याची माहिती दिली नव्हती, तसेच या बाधकामावर मुद्रांक शुल्क भरले नसल्याची माहिती त्यावेळी पुढे आली होती.

टॅग्स :Anil Parabअनिल परबEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय