अनिल डिग्गीकर मुख्यमंत्री कार्यालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 05:21 IST2018-03-07T05:21:32+5:302018-03-07T05:21:32+5:30
ज्येष्ठ आयएएस अधिकारी अनिल डिग्गीकर यांची मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कार्य अधिकारी आणि प्रधान सचिव (विशेष प्रकल्प) या पदावर आज बदली करण्यात आली. याआधी ते जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष होते.

अनिल डिग्गीकर मुख्यमंत्री कार्यालयात
मुंबई : ज्येष्ठ आयएएस अधिकारी अनिल डिग्गीकर यांची मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कार्य अधिकारी आणि प्रधान सचिव
(विशेष प्रकल्प) या पदावर आज बदली करण्यात आली. याआधी ते जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष होते. भिवंडी-निजामपूर
महापालिकेचे आयुक्त योगेश म्हसे हे राज्य सहकारी पणन महासंघाचे नवे व्यवस्थापकीय संचालक असतील. वनामती सी. यांची नंदुरबार येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहायक जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. कौस्तुभ दिवेगावकर यांची जळगाव झेडपीचे मुख्य कार्यकारी या पदावर २८ फेब्रुवारीला बदली केली होती. ती रद्द करून त्यांना लातूर पालिकेचे आयुक्त म्हणून पाठविण्यात आले आहे.