शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

15 फेब्रुवारीला अनिल देशमुख आयसोलेट नव्हते, मग काय करत होते? फडणवीसांनी केला मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 12:49 IST

शरद पवार यांनाही चुकीची माहिती देण्यात आली. परिणामी त्यांच्याकडूनही चुकीची माहितीच पत्रकारांना दिली गेली. यामुळे आता देशमुख एक्सपोझ झाले आहेत, असे फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis)

मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे 15 ते 27 फेब्रुवारीदरम्यान आयसोलेट नव्हते. या काळात ते अनेक लोकांना आणि अधिकाऱ्यांना भेटले, असे मला वाटते. असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. एवढेच नाही, तर यासंदर्भात शरद पवार यांनाही चुकीची माहिती देण्यात आली. परिणामी त्यांच्याकडूनही चुकीची माहिती पत्रकारांना दिली गेली. यामुळे आता देशमुख एक्सपोझ झाले आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.  ते पत्रकार परिषदेत बोलत होते. (Anil Deshmukh was not isolated on February 15 says Devendra Fadnavis )

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी सातत्याने वाढताना दिसत आहेत. यासंदर्भात पवारांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन, परमबीर सिंगांनी अनिल देशमुखांवर केलेले आरोप चुकीचे असल्याचे म्हणत, परमबीर सिंग सांगत आहेत त्या काळात देशमुख कोरोनामुळे क्वारंटाइन होते, असे म्हटले होते. मात्र, यानंतर फडणवीस यांनी एक ट्विट करून पवारांच्या दाव्यांचीही पोलखोल केली होती. 

"नमस्कार, मला क्षमा करा", फडणवीसांनी माफी मागून केली पत्रकार परिषदेची सुरुवात कारण... 

पोलिसांच्या दैनंदिन कार्यक्रमानुसार देशमुख मुंबईतच -यावेळी फडणवीस 15 तारखेची गृहमंत्र्यांची कार्यक्रम पत्रिका दाखवत म्हणाले, 15 तारखेला ते (देशमुख) एका खासगी विमानाने आले होते. 15 तारखेपासून ते आपल्या घरी होते. मात्र, माझ्याकडे पोलीस विभागाच्या दैनंदिन कामाचा कागद आहे. यानुसार, 17 फेब्रुवारी एक तारीख आहे. यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईत. तर अनिल देशमुख हे दुपारी 3 वाजता सह्याद्रीला येतील, असे म्हटले आहे. यानंतर 24 तारखेला पुन्हा अनिल देशमुख हे 11 वाजता मोटारीने निवासस्थानी जाणार असल्याची पोलिसांची माहिती आहे. अर्थात त्या कार्यक्रमानुसार ते गेले असतीलच, असा माझा दावा नाही, असेही फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis: "फोन टॅपिंगचे पुरावे घेऊन मी केंद्रीय गृहसचिवांना भेटतोय", देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना होणार

15 तारखेला देशमुख आयसोलेट नव्हते, अनेकांना भेटले - काल पवारांना योग्य ब्रिफिंग देण्यात आले नाही. पवारांसारख्या राष्ट्रीय नेत्याच्या तोंडून चुकीची माहिती दिली गेली आणि देशमुखांना प्रोटेक्ट केले गेले. यामुळे ते एक्सपोझ झाले आहेत. मला वाटते, की देशमूख हे 15 ते 27 फेब्रुवारीदरम्यान आयसोलेट नव्हते. या काळात ते अनेक लोकांना आणि अधिकाऱ्यांना भेटले, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.'क्वारन्टाइन'वरून अनिल देशमुख अडचणीत; १५ फेब्रुवारीच्या 'त्या' नागपूर-मुंबई विमान प्रवासावर दिलं 'स्पष्टीकरण'

तत्पूर्वी, पत्रकार परिषदेला सुरुवात करताना, आपण नेहमी मराठीत आणि हिंदीत बोलतो. पण पवारांनी हा विषय राष्ट्रीय केला आहे. त्यामुळे मी हिंदीत सुरुवा करतो आहे. त्यानंतर मराठीत बोलेले, असे फडणवीस म्हणाले. यावर काही जण इंग्रजी-इंग्रजी, असे म्हणाले. त्यावर त्यांच्या एवढे (शरद पवार) माझे इंग्रजी चांगले नाही. त्यामुळे मी हिंदीत बोलतो, अशी कोपरखळीही अप्रत्यक्षपणे पवारांना मारली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAnil Deshmukhअनिल देशमुखSharad Pawarशरद पवारBJPभाजपाParam Bir Singhपरम बीर सिंग