शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

आर्थिक गैरव्यवहारात अनिल देशमुखच मुख्य सूत्रधार, ईडीची उच्च न्यायालयाला माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 06:40 IST

Anil Deshmukh News: आर्थिक गैरव्यवहारामागे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचाच हात होता. या कटाचे तेच मुख्य सूत्रधार होते. संपत्ती जमविण्यासाठी त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला, असा आरोप ईडीने उच्च न्यायालयात गुरुवारी केला.

 मुंबई : आर्थिक गैरव्यवहारामागे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचाच हात होता. या कटाचे तेच मुख्य सूत्रधार होते. संपत्ती जमविण्यासाठी त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला, असा आरोप ईडीने उच्च न्यायालयात गुरुवारी केला.

पोलीस अधिकाऱ्यांच्या अनुकूल बदल्या आणि नियुक्त्या करण्यासाठी देशमुख यांनी आपला प्रभाव वापरला, असाही आरोप तपास यंत्रणेने केला. देशमुख यांनी केलेला अर्ज फेटाळावा, अशी विनंती ईडीने प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयाला केली. देशमुखांची सुटका करण्यात आली तर ते तपासावर प्रभाव पाडण्याची शक्यता आहे, असे ईडीने म्हटले आहे.

देशमुख यांना ईडीने २ नोव्हेंबर रोजी अटक केली. भ्रष्टाचार प्रकरणी सध्या ते सीबीआय कोठडीत आहेत. काही दिवसांपूर्वीच विशेष न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने देशमुख यांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. या अर्जावर ईडीने उत्तर दाखल केले. न्या. अनुजा प्रभूदेसाई यांच्या एकलपीठापुढे शुक्रवारी या याचिकेवर सुनावणी आहे.

देशमुख यांनी केलेल्या याचिकेवर उत्तर देताना ईडीने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. ‘हृषिकेश देशमुख, सचिन वाझे, संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांच्याबरोबर आर्थिक गैरव्यवहाराच्या रचलेल्या कटाचे मुख्य सूत्रधार अनिल देशमुखच आहेत,’ असे या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.सार्वजनिक सेवेत असताना देशमुख यांनी खूप संपत्ती जमविली आणि त्यांच्या संपत्तीचे उत्पत्तीस्थान अस्पष्ट आहे. देशमुख तपासाला सहकार्य करत नाहीत.

संपत्तीचा स्रोतबाबत त्यांनी माहिती लपवली आहे. तसेच पोलिसांच्या बदल्या व बदल्यांच्या ठिकाणांबाबत अनधिकृत यादी दिली जात असल्याचे देशमुख यांनी मान्य केले आहे. या यादीबाबत कोणतीही नोंद नाही. अद्याप तपास सुरुवातीच्या टप्प्यावर आहे. जर देशमुख यांची जामिनावर सुटका केली तर तपासात अडथळे निर्माण होतील आणि उघडकीस न आलेला गुन्हा अस्पष्टच राहील,’ अशी भीती ईडीने व्यक्त केली आहे.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयNCPराष्ट्रवादी काँग्रेस