शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना CBI ने घेतले ताब्यात, 100 कोटी वसुली प्रकरणात कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 14:33 IST

Anil Deshmukh in CBI Custody: मंगळवारी अनिल देशमुख यांना जेजे रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली, त्यानंतर आज सीबीआयने त्यांना मुंबईतील आर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेतले.

मुंबई: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh) यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) 100 कोटी वसुली प्रकरणात ताब्यात घेतले आहे. यापूर्वी देशमुख यांनी विशेष न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयने अनिल देशमुखांना मुंबईतील आर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेतले असून, त्यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

विशेष न्यायालयाच्या निर्णयानंतर भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयला अनिल देशमुख यांना ताब्यात घेण्याची परवानगी मिळाली. देशमुख यांनी सोमवारी अधिवक्ता अनिकेत निकम यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत सीबीआय कोठडीची मागणी करणाऱ्या याचिकेलाही आव्हान देण्यात आले होते. 

विशेष न्यायालयाने दिली परवानगी विशेष न्यायालयाने 31 मार्च रोजी सीबीआयमार्फत दाखल केलेल्या अर्जाला परवानगी दिली होती. तसेच, एजन्सीने अनिल देशमुख यांच्यासह संजीव पालांडे, कुंदन शिंदे (अनिल देशमुख यांचे माजी सहकारी) आणि बडतर्फ केलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे ताब्यात घेण्याची परवानगी दिली होती. दरम्यान, काल म्हणजेच मंगळवारी अनिल देशमुख यांना जे.जे. रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.  खांद्याची दुखापत झाल्यानंतर शनिवार (2 एप्रिल) रोजी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. 

माजी आयुक्तांनी गंभीर आरोप केले होतेमुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून म्हटले होते की, 'अनिल देशमुख यांनी दर महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते. त्यासाठी त्यांनी सचिन वाझे यांना वसुली करण्यास सांगितले होते. या आरोपांनंतर अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि नोव्हेंबरमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने त्यांना अटक केली.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखCBIगुन्हा अन्वेषण विभागPoliceपोलिस