शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

अनिकेत कोथळे हत्या : सांगलीच्या पोलीस अधिक्षक, उपअधीक्षकांची अखेर बदली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 19:21 IST

अनिकेत कोथळे हत्या प्रकरणी सांगलीचे पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे आणि उपअधिक्षक डॉ. दीपाली काळे यांची अखेर बद्दली बदली करण्यात आली.

सांगली :  अनिकेत कोथळे हत्या प्रकरणी सांगलीचे पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे आणि उपअधिक्षक डॉ. दीपाली काळे यांची अखेर बद्दली बदली करण्यात आली. अनिकेत कोथळे हत्या प्रकरणी प्रकरणी या दोघांची चौकशी सुरू होती. राज्याच्या गृह विभागाने गुरुवारी बदल्यांचे आदेश जारी केले.  जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची नागपूरला, तर सांगली शहर विभागाच्या पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांची सोलापूरला बदली करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी तसे आदेश काढण्यात आले. सुहेल शर्मा सांगलीचे नवे पोलिस अधीक्षक असतील, तर नांदेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक वीरकर डॉ. काळे यांच्याकडून पदभार घेतील. 

सांगली शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत दि. ६ रोजी पोलिसांच्या मारहाणीत लूटमारीच्या गुन्ह्यातील अनिकेत कोथळे या संशयिताचा मृत्यू झाला होता. पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला व झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांनी सराईत गुन्हेगाराप्रमाणे त्यास नग्न करुन उलटे टांगले व मारहाण केली होती. त्यात त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह आंबोली घाटात नेऊन जाळला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. याप्रकरणी सर्व पोलिसांना अटक करून सेवेतून बडतर्फ केले आहे. हा तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे.

या दरम्यान पोलिसांच्या ‘थर्ड डिग्री’विरुद्ध आणि काराभाराबद्दल सांगलीत आंदोलनांचा भडका उडाला होता. मंत्र्यांपासून अनेक वरिष्ठ अधिका-यांना सांगलीत यावे लागले. यापूर्वी तक्रारी असतानाही पोलिस उपनिरीक्षक कामटेवर कारवाई केली नसल्याचा आरोप करून विविध सामाजिक संघटनांनी पोलिस अधीक्षक शिंदे यांच्या बदलीची मागणी केली होती, तर मृत अनिकेत कोथळेच्या नातेवाईकांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल केल्याप्रकरणी उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांना सहआरोपी करण्याचा आग्रहही कोथळे कुटुंबियांसह सर्वपक्षीय कृती समितीने धरला आहे. वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी या दोघांबद्दलचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे.त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी (दि. २५) सांगली जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर स्वत: मुख्यमंत्र्यांनीच शिंदे आणि काळे यांच्या बदलीचा निर्णय घेतल्याचे समजते. गुरुवारी सायंकाळी तसे आदेश काढण्यात आले.

 

 

 

टॅग्स :Aniket Kothale Murderअनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणSangliसांगलीPoliceपोलिसMurderखून