शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अनिकेत कोथळे हत्या प्रकरण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष कांबळे निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 20:21 IST

अनिकेत कोथळे हत्या प्रकरणात पोलीस दलातील अजून एका अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. अनिकेत कोथळेंच्या हत्येबाबत गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई केल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष कांबळे यांना निलंबित करण्यात आले आहे.

सांगली - अनिकेत कोथळे हत्या प्रकरणात पोलीस दलातील अजून एका अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. अनिकेत कोथळेंच्या हत्येबाबत गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई केल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष कांबळे यांना निलंबित करण्यात आले आहे. याआधी या प्रकरणातील मुख्य आरोपी  पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह पाच पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते.  तर सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांची अखेर बद्दली बदली करण्यात आली. सांगली शहर पोलिसांनी ६ नोव्हेंबरला लूटमारीच्या गुन्ह्यात अनिकेत कोथळे व अमोल भंडारे या दोघांना अटक केली होती. गुन्हा कबूल करण्यासाठी अनिकेतला नग्न करुन उलटा टांगून बेदम मारहाण केली होती.  या मारहाणीत अनिकेतचा मृत्यू झाला होता. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे जंगलात नेऊन जाळला होता. तसेच अनिकेत व अमोल पोलिस कोठडीतून पळून गेल्याचा बनाव रचला होता.७ नोव्हेंबरला ही घटना उघडकीस आली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.  याप्रकरणी ८ नोव्हेंबरला बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला व झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांना अटक केली होती. सध्या हे सर्वजण न्यायालयीन कोठडीत कळंबा कारागृहात आहेत. या प्रकरणाचा संपूर्ण तपास सीआयडीचे पथक करीत आहे.दरम्यान, या प्रकरणी राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

टॅग्स :Aniket Kothale Murderअनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणCrimeगुन्हाPoliceपोलिसMurderखून