शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

सट्टा किंग अचल चौरासिया पोलिसांचा जावई आहे का ? धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2018 21:25 IST

मुंबईत येवून अचल चौरासियाला मध्यप्रदेश पोलिस अटक करतात मग महाराष्ट्र पोलिसांना का सापडत नाही. तो पोलिसांचा जावई लागला आहे का ? आपल्या गुन्हयात पोलिसांनी चौरासियाला का मागितले नाही. याचं उत्तर मंत्री देत नाहीत.

 मुंबई – मुंबईत येवून अचल चौरासियाला मध्य प्रदेश पोलिस अटक करतात मग महाराष्ट्र पोलिसांना का सापडत नाही. तो पोलिसांचा जावई लागला आहे का ? आपल्या गुन्हयात पोलिसांनी चौरासियाला का मागितले नाही. याचं उत्तर मंत्री देत नाहीत. निव्वळ विषयाला बगल देण्याचं काम मंत्री करत असून त्या चौरासिया बंधुंचे समर्थन शासन करत आहे असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. 

धनंजय मुंडे यांनी नियम १८७ अन्वये ही लक्षवेधी उपस्थित करुन सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. गेम किंग इंडिया या नावाने ऑनलाईन साखळी सट्टा चालवून दररोज कोटयवधी रुपयांचा गंडा घालणारा अचल चौरासिया मध्यप्रदेशच्या पोलिसांना सापडतो मात्र महाराष्ट्राच्या पोलिसांना सापडत नाही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत त्याला कधी अटक करणार आणि ऑनलाईन वेबसाईट किती तासात बंद करणार याचं उत्तर सरकारने दयावे अशी मागणी केली. 

पत्रकारांनी एखादी माहिती छापली तर ती तुम्हाला कशी आणि कुठुन मिळवली ही माहिती हे हुडकून काढत जेलमध्ये टाकलं जातं मात्र एवढया मोठयाप्रमाणात सट्टा पोलिसांच्या मदतीने सुरु असताना चौरासिया पोलिसांना सापडत नाही याचेच आश्चर्य वाटते असेही धनंजय मुंडे म्हणाले.

दरम्यान यावर गृहराज्यमंत्र्यांनी दिलेले थातुरमातुर उत्तर ऐकून चर्चेत भाग घेत शिवसेनेचे आमदार अनिल परबही आक्रमक झाले. या सट्टाप्रकरणात असलेल्या सिनिअर पोलिसांची मी नावे देतो किंवा माझ्यासोबत तुम्ही चला असे कितीतरी गेम तुम्हाला दाखवतो आणि त्यांच्यासोबत असलेले पोलिस दाखवतो. त्यांना निलंबित करणार आहात का? असा संतप्त सवाल अनिल परब यांनी केला. 

दरम्यान तपास यंत्रणांचे काम नीट नाही किंवा ही यंत्रणा गुन्हेगारीला साथ देत आहे. हे गुन्हे नव्या काळयातील आहेत. केंद्राच्या गृहखात्याचे सहकार्य घेवून स्वतंत्र एसआयटी नेमावी अशी मागणी आमदार हेमंत टकले यांनी चर्चेत भाग घेताना केली. 

दरम्यान  सायबर गुन्हयाच्याबाबतीत नवीन कायदा आणणार का ? त्या कायदयात अजामीनपात्र गुन्हयाची नोंद व्हावी आणि त्यात कठोर शिक्षा असणार का? अशी मागणीही मुंडे यांनी केली. यावर गृहराज्यमंत्र्यांनी ऑनलाईन सट्टा किंवा लॉटरी चालवून लोकांची फसवणूक करणाऱ्याविरुध्द व जुगाराचा अड्डा चालविणाऱ्याविरुध्द आवश्यक कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेMaharashtraमहाराष्ट्र