नाराज रसाळ मानवाधिकारमध्ये

By Admin | Updated: June 27, 2016 02:54 IST2016-06-27T02:54:21+5:302016-06-27T02:54:21+5:30

स्वाभिमान संघटनेचे अर्नाळा वॉर्ड संघटक हेमंत रसाळ यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मानवाधिकार संरक्षण संस्थानमध्ये बुधवारी जाहीर प्रवेश केला.

An angry gentle human rights | नाराज रसाळ मानवाधिकारमध्ये

नाराज रसाळ मानवाधिकारमध्ये


वसई : येथील स्वाभिमान संघटनेचे अर्नाळा वॉर्ड संघटक हेमंत रसाळ यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मानवाधिकार संरक्षण संस्थानमध्ये बुधवारी जाहीर प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशाने स्वाभिमान संघटनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत.
प्रशांत अनंत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संस्थानच्या अली प्लाझा, एम-११, डोंगरपाडा रोड, रेल्वे पुलाजवळ, विरार पश्चिम येथील कार्यलयात हा कार्यक्रम झाला. त्यांची वसई तालुकाध्यक्षपदी तीन वर्षाच्या कालावधीसाठी नेमणूक करण्यात आली आहे. या वेळी पालघर जिल्हा अध्यक्ष/मुंबई शहर संपर्कप्रमुख सागर मनोहर देशमुख, तालुका मीडिया प्रवक्ता राहुल सिंग, वसई तालुका उपाध्यक्ष धीरज सिंग, बोरिवली शहर अध्यक्ष राहुल यादव, नालासोपारा शहर अध्यक्ष विकी जाधव, कार्यकर्ता अमन शर्मा, शुभम सिंग हे उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: An angry gentle human rights