न झालेल्या लग्नाच्या अफवेचा मनस्ताप, सर्वात कमी उंची ज्योतीच्या आमगेचे कुटुंबीय हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 22:17 IST2017-09-04T22:17:14+5:302017-09-04T22:17:45+5:30
जगातील सर्वात कमी उंचीची व्यक्ती म्हणून गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली ज्योती आमगे हिला जगभरात ओळखले जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून ज्योतीचे हास्य हरविले आहे, उत्साह मावळला आहे अन् इतरांना प्रेरणा देणारी ज्योती चक्क डिप्रेस झाल्याचे सांगते आहे.

न झालेल्या लग्नाच्या अफवेचा मनस्ताप, सर्वात कमी उंची ज्योतीच्या आमगेचे कुटुंबीय हैराण
नागपूर, दि. 4 - जगातील सर्वात कमी उंचीची व्यक्ती म्हणून गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली ज्योती आमगे हिला जगभरात ओळखले जाते. सदा हसतमुख आणि चैतन्याने खळखणारे असे तिचे व्यक्तिमत्त्व आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून ज्योतीचे हास्य हरविले आहे, उत्साह मावळला आहे अन् इतरांना प्रेरणा देणारी ज्योती चक्क डिप्रेस झाल्याचे सांगते आहे. हे सगळे घडले आहे, ते तिच्या न झालेल्या लग्नाबाबत ह्यसोशल मीडिया वर उठलेल्या अफवांमुळे.
ज्योतीचे अमेरिकेतील एका एनआरआय तरुणासोबत लग्न झाल्याची पोस्ट गेल्या काही दिवसांपासून ह्यसोशल मीडियाह्णवर फिरत आहे. या पोस्ट मुळे ज्योती आणि तिच्या कुटुंबीयांना जगभरातून इंटरनेट, मोबाईलच्या माध्यमातून विचारणा होत आहे. लोकांचे फोन उचलता उचलता त्यांच्या नाकीनऊ झाले आहे. जे लग्न झालेच नाही, त्याची अफवा वेगाने पसरली आहे. याचा त्रास ज्योतीला होत आहे. आपण ह्यडिप्रेसह्ण झालो असल्याची भावना तिने फेसबुकवर व्यक्त केली आहे. मात्र तिला सर्वांकडून हिंमतीने उभे राहण्याचे पाठबळ मिळत आहे.
सायबर सेल कडे तक्रार
यासंदर्भात लोकमतने ज्योती आमगे हिच्याशी संपर्क साधला असता तिने या अफवांमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे सांगितले. जगभरात फिरत असताना अनेक जण छायाचित्रे काढतात. यातीलच एका छायाचित्राचा गैरवापर करण्यात येत आहे. यासंदर्भात मी ह्यसायबर सेलह्णकडे तक्रार केली आहे, असे तिने सांगितले.