अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवडणूक कामाची सक्ती करू नये, उच्च न्यायालयाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 15:12 IST2019-04-24T15:11:34+5:302019-04-24T15:12:00+5:30
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवडणूक कामाची सक्ती करू नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले आहेत. त्यामुळे हजारो अंगणवाडी सेविकांची निवडणुकीच्या कामामधून सुटका होणार आहे.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवडणूक कामाची सक्ती करू नये, उच्च न्यायालयाचे आदेश
ठाणे - अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवडणूक कामाची सक्ती करू नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले आहेत. त्यामुळे हजारो अंगणवाडी सेविकांची निवडणुकीच्या कामामधून सुटका होणार आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवडणूक कामाची सक्ती करू नये या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयात याचिका सादर केली होती. त्या संबंधी मा. न्यायाधीश श्री अभय ओक व मा. न्यायमूर्ती श्री कर्णिक यांनी निर्णय दिला. महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर निवडणुकीच्या कामाची सक्ती करता कामा नये असे त्यांना आदेश दिले. निवडणुकीचे काम करू न इच्छिणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करता कामा नये. असे ही आदेश मा. न्यायमूर्तींनी दिले.