अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन वाढणार!

By Admin | Updated: February 15, 2015 00:49 IST2015-02-15T00:49:12+5:302015-02-15T00:49:12+5:30

राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वाढ देण्यासाठी १७६ कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव तयार करून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच तो मांडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Anganwadi employees will increase honorarium! | अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन वाढणार!

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन वाढणार!

मुंबई : राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वाढ देण्यासाठी १७६ कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव तयार करून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच तो मांडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. येत्या ८ मार्चला महिला दिनापूर्वी ही वाढ जाहीर होण्याची शक्यता.
या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि महिला-बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेतला. ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर, महिला व बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर आदी यावेळी उपस्थित होते.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारची कामे करावी लागतात. त्या मानाने त्यांना मिळणारे मानधन तोकडे असून ते वाढविण्याचा प्रस्ताव आपल्या विभागाने वित्त विभागाला दिला आहे. या कर्मचाऱ्यांना दिवाळीला भाऊबीज भेट यापुढे नियमितपणे दिली जाईल, असे पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.
मुनगंटीवार म्हणाले की, वित्त विभागाकडून प्रस्तावाला मंजुरी देऊन तो मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी पाठविला जाईल. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Anganwadi employees will increase honorarium!