शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले

By सदानंद नाईक | Updated: November 13, 2024 19:36 IST

Yogi Adityanath News: उल्हासनगरात प्रथमच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे कुमार आयलानी यांच्या प्रचार सभेला येणार म्हणून बहुतांश उत्तर भारतीय नागरिकांनी गर्दी केली होती.

उल्हासनगर : अंटेलिया येथील सभेला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येणार म्हणून नागरिकांनी एकच गर्दी करीत ३ तास भर उन्हात तात्काळत थांबले. मात्र योगी येणार नसल्याची माहिती स्टेजवरून शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी देताच नागरिकांनी काही मिनिटात मैदान खाली केले. कुमार आयलानी समर्थकांनी मात्र सभा रद्द झाल्याने नाराजी व्यक्त केली. 

उल्हासनगरात प्रथमच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे कुमार आयलानी यांच्या प्रचार सभेला येणार म्हणून बहुतांश उत्तर भारतीय नागरिकांनी गर्दी केली होती. सभेची वेळ दुपारी अडीज वाजता असताना नागरिक भर दुपारी सभेला येऊन बसले होते. सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांना पाण्याच्या बॉटल नेण्यास पोलिसांनी मनाई केली होती. मात्र सभेला उशीर होत असल्याने, नागरिकांनी पाण्याच्या बॉटलची मागणी केली. त्यानंतर सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान सभेला मुख्यमंत्री योगी येणार नसल्याचे घोषित केले. नागरिकांनी काही मिनिटात मैदान खाली केले असून नेत्यांनी सभेच्या ठिकाणी योगी यांचे भाईंदर येथील भाषण ऐकविण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी यावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी मंत्री रवींद्र चव्हाण, कुमार आयलानी यांचे भाषण न एकताच काढता पाय घेतला. 

कुमार आयलानी यांच्या प्रचार सभेला मुख्यमंत्री योगी आले नसल्याने, भाजपा नेते रवींद्र चव्हाण, नरेंद्र राजांनी, शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी आदिनी सभेला उपस्थित असल्याची माफी मागितली. मुख्यमंत्री योगी यांच्या सभेवर आयलानी यांची भिस्त होती. मात्र योगी नं आल्याने, आयलानी कोंडीत सापडल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथulhasnagar-acउल्हासनगरmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपा