आणि गावात ७० वर्षांनंतर आली वीज...
By Admin | Updated: August 19, 2016 23:01 IST2016-08-19T23:01:01+5:302016-08-19T23:01:01+5:30
रात्रीच्या वेळी जवळपास असलेली गावे आणि सात किलोमीटरवर असलेल्या अक्कलकुवा शहरातील दिव्यांचा प्रकाश पाहून समाधान मानून काळोखात निपचित पडणाऱ्या खापराण गावात अखेर

आणि गावात ७० वर्षांनंतर आली वीज...
ऑनलाइन लोकमत
अक्कलकुवा, दि. १९ : रात्रीच्या वेळी जवळपास असलेली गावे आणि सात किलोमीटरवर असलेल्या अक्कलकुवा शहरातील दिव्यांचा प्रकाश पाहून समाधान मानून काळोखात निपचित पडणाऱ्या खापराण गावात अखेर स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर वीज पोहोचली आहे़ १५० लोकसंख्येच्या या गावात वीज पोहोचल्याने ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला़
आमलीबारी ग्रुप ग्रामपंचायतीत खापराण येथील वीज समस्या सोडवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी आणि वीज कंपनीचे अधिकारी यांनी गेल्या वर्षभरात समन्वयी भूमिका घेतल्याने वीजेची गंभीर समस्या सुटली आहे़ अक्कलकुवा शहरापासून उत्तरेला अवघ्या आठ किलोमीटरवर असूनही ७० वर्षांपासून वीजेअभावी असलेल्या खापराण गावाच्या ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता़ या पाठपुराव्याला यश आले आहे़ गावात वीज आल्याने ग्रामस्थांचा उत्साह कायम आहे़ (वार्ताहर)