... आणि शाओलिनचा घात झाला

By Admin | Updated: August 31, 2015 01:03 IST2015-08-31T01:03:33+5:302015-08-31T01:03:33+5:30

शाओलिन चंदम हा जर त्याच्या घरमालकाला तो राहात होता त्या अपार्टमेंटच्या किल्ल्या द्यायला गेला नसता तर आज तो जिवंत असता. परंतु तसे झाले नाही व चंदमच्या खोलीत राहणारा

... and Shaolin was killed | ... आणि शाओलिनचा घात झाला

... आणि शाओलिनचा घात झाला

मुंबई : शाओलिन चंदम हा जर त्याच्या घरमालकाला तो राहात होता त्या अपार्टमेंटच्या किल्ल्या द्यायला गेला नसता तर आज तो जिवंत असता. परंतु तसे झाले नाही व चंदमच्या खोलीत राहणारा त्याचा बेरोजगार सोबती त्याला ठार मारून त्याचे पैसे घेऊन पळाला. मणिपूरच्या सेवानिवृत्त कर्नलचा शाओलिन हा टेनिसचे अजिंक्यपद पटकावलेला मुलगा. शाओलिनचा २५ आॅगस्ट रोजी अमेरिकेत साऊथ व्हर्जिनियातील हॅम्पटन येथे खून झाला. त्याचा मृतदेह भारतात आणण्यासाठी त्याचा कॅनडातील चुलत भाऊ कामाला लागला आहे.
शाओलिनला बढती मिळाल्यामुळे तो १ सप्टेंबर रोजी ईस्ट कोस्ट येथे राहायला जाणार होता. त्यामुळे त्याने घरमालकाला घर रिकामे करायच्या आधी एक महिन्याची नोटीसही दिली होती. त्याच्या अपार्टमेंटमध्ये ३-४ खोल्या होत्या व त्यातील एक मारेकरी किननकडे होती. शाओलिन घरमालकाकडे किल्ल्या देण्यासाठी गेल्यावर किननने त्याला लुबाडायचे ठरविले, असे शाओलिनचे वडील रंजन चंदम यांनी सांगितले. रंजन चंदम हे आसाम रायफल्समध्ये कार्यरत होते. किननने शाओलिनला लुबाडायचे २५ आॅगस्ट रोजी ठरविले. त्याने त्याला विरोध करताच किननने त्याला गोळ््या घातल्या त्याचे पैशांचे पाकीट व मौल्यवान वस्तू असलेली बॅग घेऊन तो गेला. तो पळत होता परंतु त्याने त्याच्या एका मित्राकडे ही बॅग ठेवली. हा मित्र मग पोलिसांकडे गेला. किननला पोलिसांनी सुफोक येथे अटक केल्यावर त्याचा खुलासा झाला. खून झाला ते ठिकाण हॅम्पटन येथील लॅसले अ‍ॅव्हेन्यू.
शाओलिनच्या मृतदेहासंदर्भातील पोलिसांकडील काम पूर्ण झाले परंतु डिस्ट्रीक्ट अ‍ॅटर्नी रविवार असल्यामुळे रजेवर होते. माझा पुतण्या सर्व प्रकारच्या परवानग्या सोमवारी घेईल. आधी मृतदेह वॉशिंग्टन डीसी येथे न्यावा लागेल व तेथून तो दिल्लीला आणला जाईल, असे ते म्हणाले.
शाओलिन हा टेनिसचा अजिंक्यपद विजेता होता. चेन्नईच्या ब्रिटानिया अमृतराज टेनिस अकादमीने त्याची निवड केली होती. गुडगावमधील राष्ट्रीय टेनिस अकादमी व चंदीगढ येथील लॉन टेनिस असोसिएशनमध्ये त्याचे प्रशिक्षण पूर्ण झाले होते. साऊथ व्हर्जिनिया युनिव्हर्सिटीत तो बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन व लीडरशिप प्रोग्रॅॅम शिकत होता. सध्या तो शेल्टन ल्युकास इन्शुरन्स अँड फायनान्स सर्व्हिसेसमध्ये जरी काम करीत होता तरी त्याची युनिव्हर्सिटीने कॅप्टन म्हणून निवड केली होती.

Web Title: ... and Shaolin was killed