... आणि सा-यांचा जीव भांड्यात पडला !
By Admin | Updated: June 30, 2016 16:24 IST2016-06-30T16:14:24+5:302016-06-30T16:24:25+5:30
शालेय सत्राच्या तिस-याच दिवशी चिमुकलीचे अपहरण झाल्याची शंका आल्याने पालकांसह पोलीसही अस्वस्थ झाले. हादरलेले पोलीस चिमुकलीची शोधाशोध करू लागले.

... आणि सा-यांचा जीव भांड्यात पडला !
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि.३० - शालेय सत्राच्या तिस-याच दिवशी चिमुकलीचे अपहरण झाल्याची शंका आल्याने पालकांसह पोलीसही अस्वस्थ झाले. हादरलेले पोलीस चिमुकलीची शोधाशोध करू लागले. दोन तासातच ती आढळली अन् तिला पाहून पालकांसह पोलिसांचाही जीव भांड्यात पडला.
वेदिका नरेंद्र गौर (वय ९ वर्षे) हिच्या कथित अपहरणाचा हा किस्सा आहे. धरमपेठच्या आदर्श शाळेत चवथीत शिकणारी वेदिका बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे काछीपु-यातून पायीच शाळेला गेली. सकाळी ११ वाजता शाळा सुटली. मात्र, १२ वाजले तरी ती घरी पोहचली नाही. त्यामुळे पालकांनी तिच्या शाळेत जाऊन पाहिले. ती दिसली नाही. पुन्हा घरी आले. ती घरी पोहचलीच नव्हती. वेदिकाच्या वर्गमैत्रीणींकडे विचारणा केली असता ह्यती शाळेत आली होती. सुटी झाल्यानंतर घराकडे निघाली. कुठे गेली ते माहित नाहीह्ण, असे तिच्या मैत्रीणींनी सांगितले. परिणामी वेदिकांच्या पालकांच्या काळजाचा ठोका चुकला . तिला पळवून नेले असावे, अशी शंका घेत त्यांनी दुपारी २.३० वाजता सीताबर्डी पोलीस ठाणे गाठले. वेदिकाच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवून तिच्या अपहरणाचा संशय तक्रारीत व्यक्त केला.
शालेय सत्र सुरू होऊन अवघे तीन दिवस झाले असताना शाळकरी मुलीच्या अपहरणाची तक्रार आल्याने पोलीसही हादरले. ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांनी लगेच वेदिकाला शोधून काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक अरुण नागरे यांनी गुन्हा दाखल केला. पीएसआय पवार, पीएसआय शेजव यांच्या नेतृत्वात दोन वेगवेगळी पथके वेदिकाला शोधू लागली. एक शोधपथक दुपारी ३.३० च्या सुमारास शाळेच्या आवारात चौकशीला गेले. अन्...
शाळेच्या आवारात वेदिका आढळली. ती सुखरूप होती. कुठेच गेली नव्हती अन् अपहरणाचा तर प्रश्नच नव्हता. तिला निरागसपणे शिक्षीकेसोबत गप्ता मारताना पाहून आईने लगेच आपल्या पदरात घेतले. तिचे लाडकौतूक केले. आईवडील, पोलीसांचा ताफा पाहून शाळेत कुजबूज वाढली. काय झाले, अशी विचारणा होऊ लागली. वेदिकाच्या अपहरणाची शंका आल्याने पोलीस तिची शोधाशोध करीत होते, असे कळाल्याने सर्वच अचंबित झाले.
समुपदेशन ्अन् घरवापसी
सीताबर्डी पोलिसांनी दुपारी ४ च्या सुमारास वेदिकाला तिच्या आईवडीलांच्या स्वाधिन केले. तत्पुर्वी, कुण्या अनोळखी व्यक्तीने काही दिल्यास काही घ्यायचे नाही, त्या व्यक्तीच्यासोबत जायचे नाही, वेदिकाचे समुपदेश करण्यात आले. हो, हो करीत तिनेही पोलिसांचा निरोप घेतला.