... अन् देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पुन्हा येईन..! 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 06:34 PM2020-01-11T18:34:39+5:302020-01-11T18:38:08+5:30

तुम्हीच आमचे आजीव मुख्यमंत्री आहात, यापुढेही तुम्हीच मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते..

... And Devendra Fadnavis said, I will come again | ... अन् देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पुन्हा येईन..! 

... अन् देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पुन्हा येईन..! 

Next
ठळक मुद्दे''मोरया युथ फेस्टिवल २०२०'' चे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते

पिंपरी : मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन असा विश्वास व्यक्त केला होता. तसेच त्याच विधानाचा पुनरुच्चार करून विधानसभा निवडणूक लढविली. निकालानंतर ते पुन्हा आले पण अल्पावधीतच त्यांचे सरकार कोसळले.. आणि महाविकास आघाडीने सत्ता स्थापन करून फडणवीस यांचे मी पुन्हा येईन''चे स्वप्न वास्तविकदृष्ट्या भंग पावले. मात्र तरीही त्यांनी चिंचवड येथे एका कार्यक्रमात मी पुन्हा येईन, पण... असे म्हणून सर्वांचीच उत्सुकता वाढविली.
चिंचवड येथे कर्तव्य फाउंडेशन आयोजित मोरया युथ फेस्टिवल २०२० चे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यावेळी त्यांनी राजकारण विरहित विषयांवर आणि त्यांच्या विद्यार्थी दशेतील अनुभव यावर विद्यार्थ्यांशी  संवाद साधला. या वेळी ते बोलत होते. 


कर्तव्य फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन पटवर्धन व अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी विद्यार्थ्यांच्या वतीने फडणवीस यांना प्रश्न विचारले. शालेय जीवन, खेळ, विद्यार्थीदशेतील गमतीजमती याबाबतच्या प्रश्नांनी त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली. काही प्रश्नांना मिश्किलपणे उत्तरे देत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले. काही विद्यार्थ्यांनीही त्यांना प्रश्न विचारले. 
तुम्हीच आमचे आजीव मुख्यमंत्री आहात, यापुढेही तुम्हीच मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते, असे एक विद्यार्थी म्हणाला, तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमचे मार्गदर्शन लाभले, ते यापुढेही लाभावे पुढच्या वेळी तुम्ही मुख्यमंत्री म्हणून या कार्यक्रमाला यावे, असे एक विद्यार्थी म्हणाला. त्यावर फडणवीस म्हणाले, या वेळी फक्त इतकेच सांगतो की, मी पुन्हा येईन पण, या कार्यक्रमात...ह्ण त्यांच्या या उत्तराने प्रेक्षागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

Web Title: ... And Devendra Fadnavis said, I will come again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.