प्रसिध्द गायक आनंद शिंदे यांचा राजकीय क्षेत्रात प्रवेश

By appasaheb.patil | Published: August 28, 2019 02:56 PM2019-08-28T14:56:09+5:302019-08-28T15:02:18+5:30

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी झाली निवड

Anand Shinde's entry into the political arena | प्रसिध्द गायक आनंद शिंदे यांचा राजकीय क्षेत्रात प्रवेश

प्रसिध्द गायक आनंद शिंदे यांचा राजकीय क्षेत्रात प्रवेश

Next
ठळक मुद्दे- आनंद शिंदे यांची राजकारणात एंन्ट्री- स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड- आगामी विधानसभा निवडणुकीपुर्वी सोलापूर शहर व जिल्ह्यातील पक्षाची कार्यकारणी जाहीर

सोलापूर : स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून प्रसिध्द गायक आनंद शिंदे यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश केला आहे़ त्यांच्याकडे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येत असल्याची माहिती पक्षप्रमुख मनोज संसारे यांनी आज सोलापुरात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी प्रसिध्द गायक आनंद शिंदे, जिल्हाध्यक्ष अरूण भालेराव, प्रविण माने, दिपक गवळी, आबासाहेब साबळे आदी उपस्थित होते़ याचवेळी मनोज संसारे यांनी पक्षाची सोलापूर शहर व जिल्ह्याची कार्यकारणी जाहीर केली.

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन या संघटनेच्या सोलापूर शहर जिल्हा कार्यकारणीची घोषणा करण्यासाठी पक्षप्रमुख मनोज संसारे आज सोलापूर दौºयावर आले होते़ यावेळी स्वत: आनंद शिंदे तसेच प्रांतिकचे पदाधिकारी उपस्थित होते़ सध्याचे रिपब्लिन पक्ष मुळ आंबेडकरी विचारापासून दूर गेले आहेत़ सर्व सामान्यांचे प्रश्न सोडविण्यास अपयश आलं आहे अशी टिप्पणी मनोज संसारे यांनी केली.

Web Title: Anand Shinde's entry into the political arena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.