शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

आनंद महिंद्रांचं मोठं पाऊल! आता घराघरात पोहोचणार ऑक्सिजन, आणली 'Oxygen on Wheels' योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 12:53 IST

Anand Mahindra, Oxygen on Wheels:महिंद्रा उद्योगसमुहाचे आनंद महिंद्रा यांनी एक जबरदस्त सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

Anand Mahindra, Oxygen on Wheels: देशात सध्या कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत असून ठिकठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू असल्याच्या घटना समोर येत आहेत. देशाच्या संकट काळात अनेक उद्योगपती, सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूंपासून अनेक लोकप्रिय व्यक्ती मदत करत आहेत. त्यात आता महिंद्रा उद्योगसमुहाचे आनंद महिंद्रा यांनी एक जबरदस्त सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. (Anand Mahindra rolls out Oxygen on Wheels in Maharashtra to deal with oxygen crisis)

देशातील अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांना ऑक्सिजन मिळत नसल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. यावर तोडगा म्हणून उद्योगपती आनंद महिंदा यांनी ऑक्सिजन ऑन व्हिल्स (Oxygen on Wheels) अशी संकल्पना राबविण्याची घोषणा केली आहे. महिंद्रा कंपन्यांची वाहनं आता हॉस्पीटल्स आणि घरोघरी ऑक्सिजन सेवा पुरविण्यासाठी मदत करणार आहेत. ज्या रुग्णालयांमध्ये किंवा घरोघरी रुग्णाला तात्काळ ऑक्सिजनची गरज भासणार आहे अशा रुग्णांना सेवा देण्यासाठी ही मोबाइल ऑक्सिजन वाहनं उपलब्ध असणार आहेत. 

महिंद्रा कंपनीचे ७० बोलेरो पिकअप ट्रक हे ऑक्सिजन सिलिंडर पोहोचविण्याचं काम मोफत करणार असल्याचं आनंद महिंद्रा यांनी जाहीर केलं आहे. आनंद महिंद्रा यांनी याबाबतचं एक ट्विट देखील केलं आहे. 

"देशातील कोरोनाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी मुबलक ऑक्सिजन हीच आता गुरूकिल्ली बनली आहे. ऑक्सिजनच्या निर्मितीची अडचण नाहीय. पण आज ऑक्सिजनच्या वाहतुकीची मोठी समस्या आहे. निमिर्ती केंद्र ते हॉस्पीटल्स आणि घरोघरी ऑक्सिजन पुरवणं यात अडचणी येत आहेत. यामधला दुवा होण्याचं काम आता महिंद्रा ग्रूप होत आहे. 'ऑक्सिजन ऑन व्हिल्स'च्या माध्यमातून ऑक्सिजनची सुरळीत वाहतूक महिंद्रा ग्रूपकडून केली जाणार आहे", असं ट्विट आनंद महिंद्रा यांनी केलं आहे. 

'ऑक्सिजन ऑन व्हिल्स' या संकल्पनेअंतर्गत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आणि रुग्णालय किंवा रुग्णाचं राहतं ठिकाण या दरम्यानची ऑक्सिजनची वाहतुकीची व्यवस्था महिंद्रा कंपनीच्या वाहनांच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासोबतच आनंद महिंद्रा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेला शब्द देखील पूर्ण केला असल्याचं म्हटलं आहे. 

"मुख्यमंत्री कार्यालयाला मी शब्द दिला होता आणि ४८ तासांतच आमच्या ग्रूपनं पुणे आणि चाकण येथे ऑक्सिजन वाहतुकीची सुविधा सुरू देखील केली. २० बोलेरो वाहनं पुणे आणि चाकण येथे ऑक्सिजन वाहतुकीसाठी कार्यरत आहेत. १३ रुग्णालयांना अत्यावश्यक पातळीवर ६१ जंम्बो ऑक्सिजन सिलिंडर देखील पोहोचवले गेले आहेत. येत्या काळात आणखी मोठ्या पातळीवर महिंद्रा ग्रूपकडून मदत केली जाईल", असंही आनंद महिंद्र यांनी म्हटलं आहे. अभिनेता आर.माधवन यानंही आनंद महिंद्रा यांच्या कल्पनेचं कौतुक केलं आहे आणि मदत करण्याचीही तयारी दर्शवली आहे.  

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राcorona virusकोरोना वायरस बातम्याOxygen Cylinderऑक्सिजनCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस