शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

एक कांदा ८०० ग्रॅम ते १ किलो वजनाचा! नितीन गडकरींच्या पत्नीने केला अनोखा प्रयोग; भरघोस उत्पादन आले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 13:28 IST

Onion Farming by Nitin Gadkari: जवळपास २४ हजार कांद्याची रोपे लावण्यात आली. या काळात ७ ते १० टक्के मृत्युदर राहिला, जो शेतीच्या प्रमाणात कमी होता.

नागपूरमधील धापेवाडा येथील भक्ती फार्ममध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन यांनी ८०० ग्रॅम ते १ किलोपर्यंत वजन भरणारे कांदे उत्पादित केले आहेत. याची माहिती खुद्द नितीन गडकरी यांनी दिली आहे. गडकरींनी याचा व्हिडीओ पोस्ट केला असून बिया कुठून आणल्या, काय तंत्रज्ञान वापरले याची माहिती दिली आहे. 

हे सर्व कांदे सेंद्रिय आहेत. या बिया नेदरलँडहून आणण्यात आल्या होत्या. सेमिनीस कंपनीच्या या अडीच किलो बिया एका एकर जमिनीत पेरण्यात आल्या. तिथे ४५ दिवस नर्सरी तयार करण्यात आली. यानंतर वाढलेली रोपे दुसरीकडे लावण्यात आली. डबल ड्रिप इरिगेशन करण्यात आले.  या मातीत बायो ऑर्गॅनिक फर्टिलायझर मिक्स करण्यात आले होते. यानंतर या बेडवर मल्चिंग पेपर टाकण्यात आला, त्याला होल मारून रोपे लावण्यात आली. 

जवळपास २४ हजार कांद्याची रोपे लावण्यात आली. या काळात ७ ते १० टक्के मृत्युदर राहिला, जो शेतीच्या प्रमाणात कमी होता. अखेर कांदा तयार झाला, एका कांद्याचे वजन ४०० ग्रॅम ते ८००-१००० ग्रॅम एवढे भरले. एका एकरातून गडकरींनी १२ ते १३ टन उत्पादन घेतले आहे. या काळात सर्व प्रकारची काळजी घेण्यात आली. अशाप्रकारे जर कोणी शेतकरी सेंद्रीय शेती करणार असेल तर आम्ही त्याला पूर्ण मदत करू, असे आश्वासन गडकरी यांनी दिले आहे. 

देशामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये खरीप हंगामामध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. मात्र, काही नैसर्गिक संकट उद्भवल्यास कांद्याच्या उत्पादनामध्ये कपात होऊन देशामध्ये कांद्याची टंचाई निर्माण होऊन दरवाढ होत असते. नाशिक, पुणे व सोलापूर पट्ट्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जाते. परंतू लाल कांदा उत्पादनात नाशिक जिल्ह्याची ‘मोनोपॉली’ असल्याचे आजही मानले जाते. वास्तवात, ती पाच-सात वर्षांपूर्वीच मोडीत निघाली आहे. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान व कर्नाटकमध्ये लाल कांद्याचे मागील पाच वर्षांपासून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीonionकांदाFarmerशेतकरी