शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'सत्तेची मस्ती जास्त काळ टिकत नसते, जनता उघड्या डोळ्याने पाहतेय'; शरद पवार गटाची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 19:21 IST

पुणे येथील ससून रुग्णालयातील तृतीय पंथीय वार्डाचे उद्घाटन कार्यक्रमात हा प्रकार घडला.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासमोरच भाजपा आमदाराचा धक्कादायक प्रकार घडला आहे. भाजपा आमदार सुनील कांबळे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यास मारहाण केली. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यास मारहण केल्याची घटना घडली.  या कार्यक्रमास अजित पवार, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे यांच्यासह काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर उपस्थित होते.

पुणे येथील ससून रुग्णालयातील तृतीय पंथीय वार्डाचे उद्घाटन कार्यक्रमात हा प्रकार घडला. सदर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. त्याचबरोबर आता विरोधकांनाही सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. शरद पवार गटाने देखील सदर घटनेवरुन निशाणा साधला आहे. ससून येथील कार्यक्रमात भाजपा आमदाराने एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशीलात लगावल्याची घटना अत्यंत निंदनीय असल्याचं शरद पवार गटाने ट्विटद्वारे म्हटलं आहे.

महायुती सरकारचं चाललंय काय? अहिंसेच्या मार्गाने सुरु मराठा आरक्षण आंदोलनावर लाठीचार्ज काय होतो, वारकऱ्यांवर लाठीचार्ज होतो ते करण्याचे आदेश नेमके कोण देतं? एक मंत्री पोलिसांना जनतेला मारायला काय सांगतो, आमदार पोलिसांना मारतो काय, हे अतिशय गुंड प्रवृत्तीचे सरकार आहे, अशी टीका शरद पवार गटाने ट्विटद्वारे केली आहे.

पोलीस हे जवाबदार शासकीय कर्मचारी असून तुम्ही त्यांचे मालक नाहीत. पोलिसांवर अन्याय होत असताना राज्याचे गृहमंत्री गप्प का? आपल्या पक्षाच्या आमदारावर कारवाई करण्याच्या सूचना ते आपल्या विभागाला देतील का? या ट्रिपल इंजिन खोके सरकारकडून सामान्य जनतेसह पोलिसांवर होत असलेली दादागीरी अजिबात खपवून घेतली जाणार नाही. राज्यातील जनता हे उघड्या डोळ्याने पाहत आहे, ही सत्तेची मस्ती जास्त काळ टिकत नसते, असंही शरद पवार गटाने म्हटलं आहे. 

या घटनेनंतर काय म्हणाले सुनील कांबळे?

भाजपाचे आमदार सुनील कांबळे यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, "मी ससूनमध्ये कोणत्याही पोलिसाला मारहाण केली नाही. तो माझ्या अंगावर पडल्यामुळे मी त्याला बाजूला सारून निघून गेलो." तसेच, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला मी मारहाण केली नाही, त्याला सिव्हिल कपड्यांमध्ये असणाऱ्या पोलिसांनीच मारहाण केल्याचे सुनील कांबळे यांनी सांगितले. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार