शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
3
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
6
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
7
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
8
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
9
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
10
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
11
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
12
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
14
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
15
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
16
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
17
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
18
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
19
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
20
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 

सहलीला जाणाऱ्या स्कुल बसला अपघात; २२ जण जखमी

By मारोती जुंबडे | Updated: December 11, 2022 17:07 IST

स्कूल बस आणि एसटी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये २२ जण जखमी झाले आहेत.

खंडाळी :

स्कूल बस आणि एसटी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये २२ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथे नेण्यात आले आहे. हा अपघात गंगाखेड- राणीसावरगाव रोडवरील खंडाळी गावाजवळ झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपळदरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

गंगाखेड शहरातील संत जनाबाई विद्यालयाची स्कूल बस विद्यार्थ्यांना घेऊन सहलीसाठी चाकूरकडे जात होती.  गंगाखेड तालुक्यातील खंडाळी गावाजवळ स्कुल बस आली असता अहमदपूर वरून बुलढाण्याला जाणाऱ्या बस क्रमांक एमएच २०,२००६९ एसटी बसचा आणि स्कूल बसचा रविवारी सकाळी ९:४५ वाजता समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात स्कूल बसमधील विद्यार्थी आणि एसटी बसमधील २२ पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये महमूद शेख (६०, रा. अहमदपूर),  राम मिलिंद गायकवाड (१०),श्याम राजाभाऊ कदम (२६ रा. पोखर्णी देवी),रत्नमाला उध्दव रेखावार (६०),उद्धव नारायणराव रेखावार (६५ रा. अहमदपूर), रामप्रसाद जोतिबा कोकाटे (१३), नारायण श्रीमंतराव गीते (५४), अश्विनी बालाजी कांगणे (२६), मीना नानाभाऊ जाधव (३५),सुजाता किशोर सोनवणे (२१), अनुराधा तुकाराम होळंबे (४४),  छाया अशोक सोनुळे (४८),  रेणुका श्रीनिवास गीते (३५), वेदांत महामुने (१२), शिवाजी महामुने (४२), वर्षा ज्योतिबा कोकाटे (३०), दिलीप रावसाहेब हाके (५५ रा. शिरनाळ ता. चाकुर), नंदा सत्यनारायण पुरोहित (५० रा. मेहकर),  अनंता उद्धव सोनाळे (४०), कृष्णा अच्चुत दहिफळे (४५), सुर्वणा बहूरे (३१), अनुराधा बहूरे (४४ रा. सर्व गंगाखेड) हे २२ जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळतात पिंपळदरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये नेण्यात आले आहे. या ठिकाणी डॉक्टर व  रुग्णालयाच्या परिचारिकांनी अपघातामध्ये जखमी झालेल्या जखमींवर उपचार केला. अपघातात जखमी झालेल्या सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथे नेण्यात आले आहे. अशी माहिती गंगाखेड उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

नागरिकांनी चालकाला काढले बाहेर स्कूल बस आणि  बसचा अपघात झाल्यानंतर एसटी बसचा चालक हा केबिनमध्ये अडकला होता. पिंपळदरी पोलिसांनी आणि नागरिकांनी शर्तीचे प्रयत्न करून चालकाला बाहेर काढले आहे. त्याला उपचारासाठी गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले.  या अपघातामुळे एकच खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Accidentअपघात