शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine: नियम, कायद्याच्या वर कोणीही नाही; तन्मयच्या कोरोना लसीवर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 16:17 IST

corona vaccine: अमृता फडणवीस यांनीही या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ठळक मुद्देतन्मय फडणवीस प्रकरणी अमृता फडणवीस यांची प्रतिक्रियाआम्ही नेहमीच न्यायासाठी उभे आहोत - अमृता फडणवीसनियम, कायद्याच्या वर कोणीही नाही - अमृता फडणवीस

मुंबई: एकीकडे रेमडेसिविरच्या मुद्द्यावरून राज्यात राजकारण तापले असताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर काँग्रेसने हल्लाबोल केला होता. देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस यानं ‘कोरोना’ची लस घेतल्याचा फोटो ‘व्हायरल’ झाला होता. त्याचं वय ४५ च्या वर नसतानादेखील त्याला लस कशी काय मिळाली, असा प्रश्न काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला होता. यावरून देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले असून, आता अमृता फडणवीस यांनीही या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. (amruta fadnavis reacts over tanmay fadnavis got corona vaccine)

देवेंद्र फडणवीस यांच्या पुतण्याने वयाचे निकष पूर्ण होत नसतानाही कोरोना लस घेतल्यामुळे सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह अन्य पक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवताना दिसत आहेत. अशातच देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी या प्रकरणावर ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. 

आम्ही नेहमीच न्यायासाठी उभे आहोत

कोणत्याही सेवेची प्राथमिकता शिष्टाचार किंवा प्रचलित धोरणाच्या आधारे असावी. नियम आणि कायद्याच्या वर कोणीही नाही. कायदा आपले काम करू शकतो. आम्ही नेहमीच न्यायासाठी उभे आहोत. आम्ही या विषयावर आपल्यासोबत आहोत. कृपया भविष्यात रांगा तोडण्याचे प्रकार थांबवण्यासाठी योग्य कृती करा, असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केलेल्या टीकेला अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी ‘याला म्हणतात विशेषाधिकार’ असे म्हणत निशाणा साधला होता. 

देशात नवा मोदी अ‍ॅक्ट आलाय की काय? नवाब मलिकांचा भाजपवर पलटवार

देवेंद्र फडणवीस यांनी दिले स्पष्टीकरण

तन्मय फडणवीस हा माझा दूरचा नातेवाईक आहे. त्याला कोणत्या निकषांप्रमाणे लसीचा डोस देण्यात आला याची मला कल्पना नाही. हे नियांमांनुसार झाले असेल तर त्यावर आक्षेप घेण्याचे कारण नाही. परंतु नियमांचे उल्लंघन करून जर झाले असेल तर ते अयोग्य आहे. नियमांनुसार पात्र नसल्याने माझ्या पत्नीला आणि मुलीलाही लस देण्यात आली नाही. प्रत्येकाने नियमांचे पालन करावे हे माझे ठाम मत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. 

“माजी मुख्यमंत्री रात्री दोन वाजता दोन-दोन मंत्री घेऊन धावाधाव करतात, हे मोठं दुर्दैव”

दरम्यान, तन्मय फडणवीस माजी मंत्री शोभा फडणवीस यांचा नातू असून, त्याचे वय २५ वर्षांहून अधिक नाही. नागपुरातील ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ येथे त्याने लस घेतल्याचा ‘फोटो’ सोमवारी ‘सोशल मीडिया’वर ‘व्हायरल’ झाला. रात्री ‘इन्स्टाग्राम’वरून तो ‘फोटो’ हटविण्यात आला, मात्र तोपर्यंत अनेकांनी ‘स्क्रीनशॉट्स’ घेऊन ठेवले होते.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAmruta Fadnavisअमृता फडणवीसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारण